Shravan 2023 Bilva Patra Aka Bael Leaves Health Benefits From Diabetes To Constipation; शंकराला वाहिले जाणारे बेलाचे पान आहे आरोग्यासाठी फायदेशीर, डायबिटीसपासून बद्धकोष्ठतेवर गुणकारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका

बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका

बेलाच्या पानाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी आणि गॅससारख्या समस्येपासून सुटका मिळते. मुळात यामुळे पचनक्रिया योग्यरित्या सुरळीत झाल्याने या समस्येपासून सहजपणे सुटका मिळवू शकता. बेलाच्या पानात असणारे फायबर पोट स्वच्छ करून अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळवून देते.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

बेलाच्या पानातील असणारे विटामिन सी हे प्रतिकारशक्ती अधिक बळकट करण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी उपाशीपोटी बेलाची २-३ पाने चावावीत. यामुळे प्रतिकारशक्ती वाढून सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांपासूनही दूर राहण्यास मदत मिळते.

(वाचा – रोज डुलकी घेण्याचे ७ फायदे, हार्ट हेल्थवर होतो सकारात्मक परिणाम)

हृदयाचे आरोग्य चांगले राखते

हृदयाचे आरोग्य चांगले राखते

बेलाच्या पानात आढळणारे अँटीऑक्सिडंट हे हृदय रोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. रोज सकाळी उपाशीपोटी बेलाच्या पानाचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत मिळते. आयुर्वेदानुसार, बेलाच्या पानाचा रस प्यायल्यामुळे श्वासासंबंधित आजारही बरे होतात. याशिवाय ब्लड प्रेशर रोखण्यासही याची मदत मिळते.

(वाचा – कमी वयात दात सडून कमकुवत होण्यामागे हे आहे मोठं कारण, वेळीच करा उपाय नाहीतर तरूणपणीच लागेल कवळी)

डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर

डायबिटीस रूग्णांसाठी फायदेशीर

बेलाच्या पानातील पोषक तत्वांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत मिळते. जे डायबिटीस रूग्ण आहेत, ते आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन बेलाच्या पानाचे अथवा बेलाच्या रसाचे सेवन करू शकतात. रोज सकाळी बेलाच्या पानाचे सेवन केल्यास डायबिटीस कमी होण्यास मदत मिळते.

(वाचा – Weight Loss Drink: वजन कमी करण्यासाठी वापरा दालचिनी-धणे आणि जिऱ्याचे पाणी, झर्रकन दिसेल फरक)

शरीराला थंडावा देण्यासाठी

शरीराला थंडावा देण्यासाठी

बेलाच्या पानामध्ये थंडावा असतो, याचे सेवन केल्याने पोटात थंडावा राहातो. उन्हाळ्याच्या दिवसातही याचे सेवन केल्याने लू च्या त्रासापासून बचाव होऊ शकतो. उष्णतेमुळे तोंड येत असेल तर त्यावर बेलाचे पान हा उत्तम उपाय ठरू शकतो.

कसे करावे बेलपानाचे सेवन?

कसे करावे बेलपानाचे सेवन?
  • उपाशीपोटी बेलाच्या पानाचे सेवन करण्यासाठी त्याचा काढा तुम्ही तयार करून घेऊ शकता. यासाठी पाण्यात बेलाची पाने उकळवा आणि मग गाळून ते पाणी प्या
  • सकाळी उपाशीपोटी तुम्ही बेलाची पाने चावून खाऊ शकतामध आणि बेलाची पाने एकत्र खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा

[ad_2]

Related posts