Maharashtra News Nashik News NCP President Sharad Pawar Will Public Meeting Tomorrow In Yeola Nashik District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Sharad Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिक दौऱ्यावर येत असून ते छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातून सुरवात होत आहे. दुसरीकडे पावसाळी वातावरणामुळे शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा रद्द होण्याचे संकेत असताना मात्र नाशिकचा दौरा निश्चित असून उद्या येवल्यातील बाजार समिती मैदानात शरद पवार यांची सभा होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

अजित पवार (Ajit यांच्यासोबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी (Maharashtra NCP) पक्षात मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर दोन्ही गटाची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीतून अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार टीकाही केली. उद्या 8 जुलै रोजी येवला (Yeola) येथील बाजार समिती आवारात या सभेचे आयोजन करण्यात आले असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पवार समर्थकांनी जोरदार तयारी करण्यावर भर दिला आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नेते माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी सभास्थळाची पाहणी करत आढावा घेत आहेत. ईडीच्या धाकाने भुजबळांनी शरद पवारांना सोडल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. उद्याच्या सभेतून खा.पवार यांच्यासह इतर नेते भुजबळांना उत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

येवल्याचे राष्ट्रवादीचे जुने नेते म्हणून ओळखले जाणारे माणिकराव शिंदे देखील पुन्हा पक्षात प्रवेश करत शरद पवारांना पाठिंबा जाहीर केला. शिंदे यांनी सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली. छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी विरोधात काम केल्यामुळे माणिकराव शिंदे यांची राष्ट्रवादीतून 2019 साली हकालपट्टी झाली होती. मात्र छगन भुजबळ हेच पवारांच्या विरोधात गेल्याने शरद पवारांची भेट घेऊन शिंदे यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. तर 2004 साली छगन भुजबळ यांचे याच येवल्यात शरद पवार यांनी पुनर्वसन केले होते. त्याच भुजबळांनी ईडीच्या धाकाने शरद पवार यांना सोडल्याचा आरोप यावेळी माणिकराव शिंदे यांनी केला. उद्या होणाऱ्या सभेतून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना उत्तर देतील. या सभेची संपूर्ण तयारी सुरू आहे. शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेस उपस्थित राहतील असा आशावाद माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला.

उद्या येवल्यात पहिली सभा 

शरद पवार लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असून त्याची सुरुवात नाशिक (Nashik) जिल्ह्यापासून होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला उद्या 8 जुलै रोजी शरद पवार यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा होणार आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्यासोबत गेलेले छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात ही सभा होणार असल्याने राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांचे पहिले टार्गेट छगन भुजबळ असणार हे या सभेच्या माध्यमातून निश्चित झाले आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात 8 जुलैला ही सभा होणार आहे. राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ येवला इथे फुटणार असून उद्या, शनिवार, 8 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता येवला, नाशिक इथे सभा होणार आहे. तर धुळे आणि जळगाव दौरा पावसाचा अंदाज घेऊन लवकरच जाहीर होईल, असेही सांगण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Sharad Pawar : शरद पवारांचं पहिलं टार्गेट छगन भुजबळ; पहिली सभा होणार भुजबळांच्या येवला मतदारसंघात…

[ad_2]

Related posts