Samsung-galaxy-m34-launched-in-india-check-price-offers-specifications And More Details Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Samsung Galaxy M34 5G Price in India : सॅमसंगच्या (Samsung) स्मार्टफोनचं वैशिष्ट्य हे आपल्या सगळ्यांनाचा माहित आहे. कमी पैशांत जास्तीत जास्त फिचर्स उपलब्ध करून देणारा हा स्मार्टफोन तरूणाईत विशेष लोकप्रिय आहे. असाच एक स्मार्टफोन Samsung ने नुकताच भारतात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M34 5G असं या स्मार्टफोनचं नाव असून तुम्ही हा स्मार्टफोन अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये नेमकी कोणती वैशिष्ट्य आहेत ते जाणून घेऊयात. 

Samsung Galaxy M34 5G स्पेसिफिकेशन्स कोणते?

Samsung Galaxy M34 मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले फुल HD+ स्क्रीन रिझोल्यूशनसह येतो जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा 12MP उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे ज्यात 6/128GB आणि 8/128GB चा समाविष्ट आहे. हा स्मार्टफोन Exynos 1280 SoC सह येतो. तसेच, यामध्ये तुम्हाला 25W च्या फास्ट चार्जिंगसह 6000mAh बॅटरी मिळते.

Samsung Galaxy M34 5G किंमत किती? 

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy M34 5G चा हा स्मार्टफोन अगदी बजेट फ्रेंडली आहे. या स्मार्टफोनची किंमत 16,999 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला जर हा स्मार्टफोन हवा असेल तर यामध्ये तीन कलर ऑप्शन्स देण्यात आली आहेत. ज्यामध्ये प्रिझम सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि वॉटरफॉल ब्लू कलरचा समावेश आहे. Samsung Galaxy M34 5G ची विक्री 16 जुलैपासून सुरू होणार आहे. मात्र, तुम्ही हा स्मार्टफोन प्री-ऑर्डर देखील करू शकता. 

Oppo लवकरच लॉन्च करणार 3 नवीन स्मार्टफोन  

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo 10 जुलै रोजी भारतात Oppo Reno 10 सीरीज अंतर्गत 3 नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या सीरीज अंतर्गत Oppo Reno 10, Oppo Reno 10 pro आणि Oppo Reno 10 Pro plus स्मार्टफोन लॉन्च केले जातील. बेस व्हेरिएंट व्यतिरिक्त दोन्ही मॉडेल्सची किंमत लीक झाली आहे. लीक्सनुसार, Oppo Reno 10 pro आणि Oppo Reno 10 Pro plus ची किंमत जवळपास 40,999 रुपये आणि 54,999 रुपयांपर्यंत असू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

Threads ची धमाल! 24 तासांत सुमारे 10 कोटी पोस्ट, ट्विटरला डिवचणाऱ्या मीम्स व्हायरल

[ad_2]

Related posts