Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning Today 08th July 2023 Saturday Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

1. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, उत्तर भारतात मुसळधार पाऊस  

देशभरात मान्सून दाखल झाला आहे. सध्या देशातील विविध राज्यात पाऊस बरसत आहे. महाराष्ट्रातही काही भागात चांगला पाऊस पडत आहे. मात्र, अद्याप अनेक भागात पावसानं दडी मारल्याने बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच कोकणातही जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान हवामान विभागाने आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उत्तर भारतात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाचा सविस्तर

2. सुरक्षा यंत्रणांकडून 250 दहशतवाद्यांची यादी जारी, सर्वांची संपत्ती होणार जप्त

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले कायम सुरुच असतात. त्यामुळे सुरक्षा दल आणि प्रशासनाकडून दहशतवादी कारवायांना नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरुच असतात. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक तरुणांना दहशतवाद पसवण्यासाठी प्रवृत्त केलं जातं. त्यामुळे येथील हल्ले होत असतात. या दहशतवाद पसरवण्याच्या या प्रयत्नांना आवर घालण्यासाठी आता सुरक्षा दलाने सुमारे 250 दहशतवाद्यांची यादी जारी केली आहे. या यादीतील सर्वांची संपत्ती आता जप्त करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर

3. Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेदरम्यान 9 यात्रेकरुंचा मृत्यू, बाबा बर्फानी यांची यात्रा तात्पुरती स्थगित

पवित्र अमरनाथ यात्रेदरम्यान गेल्या दोन दिवसांत सहा यात्रेकरूंचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यू झालेल्या यात्रेकरुंची संख्या वाढली आहे. यंदाच्या यात्रेदरम्यान आतापर्यंत एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 यात्रेकरु जखमी झाले आहेत. दरम्यान, काश्मीरमध्ये शुक्रवारी मुसळदार पाऊस सुरु होता. यामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून हवामान पूर्ववत झाल्यावर यात्रेला पुन्हा सुरुवात करण्यात येईल. वाचा सविस्तर

4. राष्ट्रवादीत उभी फूट म्हणजे शरद पवारांनी ठरवून केलेला कार्यक्रम; चंद्रराव तावरे यांचा आरोप

शरद पवार यांनी कुटुंबाला कारवाईपासून वाचवण्यासाठी पक्षात फूट पाडण्याचे नाटक केलं असल्याचा आरोप शरद पवार यांचे जुने सहकारी आणि विद्यमान भाजपचे नेते चंद्रराव तावरे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट नाही तर हे ठरवून केलेलं असल्याचा आरोप तावरे यांनी केला आहे. चंद्रराव तावरे हे 40 वर्षं शरद पवारांसोबत होते. शरद पवार यांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचारापासून त्यांनी अनेक निवडणुकात त्यांचा प्रचार केला आहे. वाचा सविस्तर

5. फडणवीसांनी रात्री घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, दोघांमध्ये तब्बल सव्वा दोन तास चर्चा 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री तब्बल दोन तास चर्चा झाली आहे. वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस हे सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी फडणवीस तेथून बाहेर पडले. वाचा सविस्तर 

6. 8th July In History: साहित्यिक गो. नी. दांडेकर, कॉम्रेड ज्योती बसू आणि सौरव गांगुली यांचा जन्म; आज इतिहासात

इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. आजचा दिवसही इतिहास आणि राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. साहित्यिक गो.नी. दांडेकर यांचा जन्मही आजच झाला. त्याशिवाय भारतीय राजकारणात आपली छाप सोडणारे कम्युनिस्ट नेते ज्योती बसू यांची जयंती आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वाढदिवस आज आहे. वाचा सविस्तर

7. Horoscope Today 08 July 2023 : आज ‘या’ राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

आज शनिवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. तूळ राशीच्या लोकांना व्यवसायाला पुढे नेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. तर मिथुन राशीला व्यवसायाशी संबंधित सहलीला जाण्याचीही शक्यता आहे. कसा राहील मेष ते मीन राशींसाठी शनिवार? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

[ad_2]

Related posts