New Railway App Piponet You Will Get The Train Ticket Confirmati And Many More In One App

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Piponet Railway App:   NuRe भारत नेटवर्क आणि रेलटेल (RailTel) हे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन अॅप  लाँच करणार आहेत. या अॅपचे नाव  PIPOnet असं आहे.  या मध्ये रेल्वे प्रवाशांना अनेक सेवा मिळणार आहेत. NuRe भारत नेटवर्क आणि RailTel यांच्याकडून PIPOnet हे नवीन रेल्वे अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंग, मनोरंजन, कॅब बुकिंग आणि इतर काही सेवा मिळणार आहेत. या अॅपमध्ये काय खास आहे? हे जाणून घेऊयात…

अनेक सेवा या एकाच अॅपमध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत. याशिवाय या अॅपमध्ये प्रवाशांना ऑनलाइन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, मुक्काम आरक्षण इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अॅपमध्ये जाहिराती  देखील असणार आहेत.  RailTel नं दिलेल्या माहिती नुसार, NuRe Bharat Network सोबत यासाठी भागीदारी करण्यात आली आहे. कंपनीने पुढील 5 वर्षांत अॅपमधून 1,000 कोटी रुपयांच्या कमाईचे लक्ष्य ठेवले आहे.

PIPOnet  हे अॅप येत्या दोन आठवड्यांत अँड्रॉइड प्ले स्टोअरवरुन (Android Play Store) डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल, असं म्हटलं जात आहे. आयओएस वापरकर्त्यांसाठी हे अॅप  उपलब्ध असेल की नाही?  याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

PIPOnet या एकाच रेल्वे अॅपमध्ये तुम्हाला इतर अनेक अॅप्सच्या सुविधा मिळतील. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांना वेगवेगळे अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही.

PIPOnet  या अॅपमधून कोणतीही सेवा मोफत दिली जाणार नाही. म्हणजे तुम्हाला या अॅपमधून ऑनलाइन ट्रेन तिकिटा बुक केले तर त्याचे पैसे  द्यावे लागतील. तसेच, जर तुम्हाला या अॅपमधील इतर कोणत्याही सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील.

नुरे भारत नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅक्स कृष्णा यांनी यांनी एका निवेदनात म्हटले की, ”Nure Bharat Network हे स्पष्ट करू इच्छिते की, Netflix, Ola, Uber आणि इतर कोणत्याही कंपनीची नावे जी PIPOnet या अॅपसोबत जोडले गेलेले नाही. मनोरंजन, प्रवास आणि इतर सुविधांचा परिचय देण्यासाठी केवळ उदाहरणाचा एक भाग म्हणून या अॅपचा उल्लेख करण्यात आला होता. आम्ही अद्याप कोणत्याही अन्य कंपनीसोबत याबाबत चर्चा केलेली नाही.”  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Vande Bharat: आता मुंबई-गोवा प्रवास होणार हायस्पीड; महाराष्ट्राला मिळणार चौथी ‘वंदे भारत’ ट्रेन

[ad_2]

Related posts