Minister of Pakistan Will Take An Overview Of Security In India For ODI World Cup 2023 ; भारतात वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानचे मोठे पाऊल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इस्लामाबाद : परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागाबाबतचा अहवाल देणार आहे. ही समिती लवकरच भारत दौऱ्यावर येणार असून, पाकिस्तानचे सामने होणार असलेल्या ठिकाणांच्या सुरक्षेबाबत आढावा घेणार आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी नियुक्त केलेल्या या समितीत बिलावल यांच्यासह तीन मंत्र्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पाकमधील आगामी निवडणूक लक्षात घेऊन सर्व प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे.

भारतात ५ ऑक्टोबरपासून होणाऱ्या वर्ल्ड कप वन डे क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे; मात्र अजूनही त्यातील पाकिस्तानचा सहभाग निश्चित नाही. पाक संघाच्या स्पर्धेतील सहभागास अद्याप पाकिस्तान सरकारने मान्यता दिलेली नाही. पाकिस्तान सरकारचे पथक भारतातील सुरक्षेबाबत आढावा घेणार आहे. त्यानंतरच पाकिस्तान सरकार अंतिम निर्णय घेईल. भारतातील वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागाबाबत पाक बोर्डाने तेथील सरकारची परवानगी मागितली आहे. त्याच पत्रात सरकार सुरक्षा पथक पाठवणार का? अशीही विचारणा करण्यात आली होती.

पाकिस्तान आणि भारत यांच्यात १५ ऑक्टोबरला वर्ल्ड कपमधील साखळी लढत अहमदाबादला होणार आहे. या सामन्याबाबत सुरक्षा समितीचा अहवाल महत्त्वाचा असेल. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ हैदराबाद, बेंगळुरू, कोलकाता आणि अफगाणिस्तान येथे खेळणार आहे. अहमदाबाद वगळता अन्य ठिकाणी पाकिस्तान दोन सामने खेळणार आहे. परराष्ट्र मंत्री झरदारी प्रमुख असलेल्या समितीत अंतर्गत सुरक्षा मंत्री राणा सानानुल्ला, कायदा आणि न्याय मंत्री आझम नझीर तरार हे मंत्रीही आहेत. त्याचबरोबर आंतर प्रदेशीय समन्वय मंत्री एहसान उर रेहमान माझारी, माहिती मंत्री मरियम औरंगजेब, असद मेहमूद, अनिमुल हक, कमार झमन कायरा आणि पंतप्रधानांचे परराष्ट्र विषयक सल्लागार तारिक फातेमी यांचाही समावेश आहे.

या समितीत गुप्तचर यंत्रणेतील सदस्यांसह परराष्ट्र खात्यातील सचिवही आहेत. त्याचबरोबर विविध पक्षांच्या नेत्यांचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारचा कालावधी ३४ दिवसांचा आहे. त्यानंतर निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेत बदल झाल्यास भविष्यात कोणतेही प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठीच सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश केला असल्याचे मानले जात आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

एखाद्या क्रीडा स्पर्धेतील राष्ट्रीय संघाच्या सहभागाबाबतचा निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानने प्रथमच एवढी उच्चस्तरीय समिती नेमली आहे. यापूर्वी पाकिस्तान संघाच्या भारतातील स्पर्धेतील सहभागाबाबतचे निर्णय परराष्ट्र मंत्रालयच घेत असे; मात्र या वेळी केवळ भारतातच होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेबाबत निर्णय होणार आहे. सर्वंकष परिस्थिती लक्षात घेऊनच या स्पर्धेतील सहभागाबाबत कोणताही चुकीचा निर्णय घेतला जाऊ नये, यासाठी पाकिस्तानचे सरकार विशेषतः पंतप्रधान शरीफ लक्ष देत आहेत.

[ad_2]

Related posts