Digha railway station on uran local and trans harbor route will open for passengers soon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

उरण लोकल (Uran Local) आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील (Trans-Harbour line) दिघा रेल्वे स्थानक (Dighe Railway Station) लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याची चिन्हे आहेत.

मध्य रेल्वेचा महत्त्वकांक्षी प्रकल्प बेलापूर-खारकोपर-उरण मार्ग आणि दिघा रेल्वे स्थानक येत्या १० दिवसांत सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. (Mumbai Local Train News)

दिघा रेल्वे स्थानकाचे लोकार्पण ६ एप्रिल रोजी करण्यात येणार होते. मात्र,काही कारणांमुळं हे रखडले होते. मात्र, आता रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी सज्ज झाले असून लवकरच स्थानकाचे उद्घाटन करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

विटावा, दिघा येथील रहिवाशांसाठी हे स्टेशन फायदेशीर ठरणार असून गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिक या स्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. 

मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉरचा पहिला टप्पा म्हणजे दिघा स्थानक आहे. हे स्थानक खुले झाल्यानंतर ट्रान्सहार्बर मार्गावरील सर्व लोकल या स्थानकांत थांबणार आहेत. 

स्थानकाचे काम 200 कोटी रुपये खर्चून पूर्ण केले आहे. या स्थानकामुळं कल्याण ते नवी मुंबई प्रवास सुकर होणार आहे.

विटावा व दिघा परिसरातील नागरिकांना लोकल पकडण्यासाठी ठाणे किंवा ऐरोली स्थानक गाठावे लागते. मात्र आता दिघा स्थानक सुरु झाल्यानंतर त्यांचा त्रास कमी होणार आहे. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts