Harmanpreet Kaur Beats Rohit Sharma Virat Kohli Becomes First Player To Achieve Elusive T20i Feat

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND W vs BAN W T20 : भारतीय महिला क्रिकेट संघाने (Team India Womes) पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशचा (Bangaladesh) सात गडी राखून दणदणीत पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाची (Team India) कर्णधार हरमनप्रीत कौरनं नवा विक्रम रचला आहे. हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हरमनप्रीतनं 54 धावांची नाबाद खेळी (Harmanpreet Kaur Record) केली. या सामन्यातील दमदार खेळीसाठी हरमनप्रीतला प्लेअर ऑफ द मॅच (Player of The Match) पुरस्कार मिळाला. यासोबतच हरमनप्रीत कौरनं टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) मागे टाकलं नवा पराक्रम गाजवला आहे. 

हरमनप्रीत कौरची दमदार अर्धशतकी खेळी

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकत एक मोठा विक्रम केला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी झालेल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला. टीम इंडियाने 9 जुलै रोजी बांगलादेश दौऱ्याला टी-20 मालिकेद्वारे सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात भारताने बांगलादेशवर 7 विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत कौरने 35 चेंडूत 54 धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी तिने 6 चौकार आणि 2 षटकारही ठोकले. हरमनप्रीतला या अप्रतिम अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टाकलं मागे

भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅच म्हणजेच सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम हरमनप्रीतने आपल्या नावावर केला आहे आहे. या सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौर रोहित शर्मा बरोबरीने पहिल्या क्रमांकावर होते. दोघांनी कर्णधार म्हणून त्यांच्या टी20 कारकिर्दीत प्रत्येकी 5 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला होता. पण आता हरमनप्रीत कौरने रोहित शर्माला मागे टाकलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जिंकत हरमनप्रीतनं सहाव्यांदा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. विराट कोहलीने कर्णधार असताना तीन वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला होता.

प्लेअर ऑफ द मॅच मिळवणारे कर्णधार

  • हरमनप्रीत कौर – 6
  • रोहित शर्मा – 5
  • विराट कोहली – 3
  • मिताली राज – 1

 

संबंधित इतर बातम्या :

[ad_2]

Related posts