CSK Top Wicket Taker Tushar Deshpande Out Of Squad ; CSK कडून सर्वाधिक विकेट मिळवणारा तुषार देशपांडे संघाबाहेर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघातून सर्वाधिक विकेट घेतल्यावर तुषार देशपांडेला अखेर संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. आयपीएलमध्ये तुषार हा भन्नाट फॉर्मात होता. पण आता संघ निवडताना मात्र त्याला संधी देण्यात आलेली नाही.

देवधर करंडक विभागीय वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी पश्चिम विभाग संघात स्थान नाकारण्यात आले. या संघात मुंबईचा आक्रमक फलंदाज शिवम दुबे याची निवड करण्यात आली आहे. चार वर्षानंतर देवधर करंडक स्पर्धेचे पुनरागमन होत आहे. मुंबई निवड समितीचे अध्यक्ष राजू कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पश्चिम विभाग निवड समितीने पश्चिम विभागाचे नेतृत्व प्रियांक पांचालकडेच कायम ठेवले. दुलीप स्पर्धेसाठी तुषार राखीव होता. आत्ताही त्याची राखीव म्हणूनच निवड झाली आहे. आयपीएलमध्ये १६ सामन्यांत २१ फलंदाजांना तुषारने बाद केले होते; पण त्याला मर्यादित षटकांच्या लढतीसाठी संघात स्थान नाकारण्यात आले. त्याने २९ प्रथम श्रेणी सामन्यांत ८० फलंदाज बाद केले आहेत. पृथ्वी सावने आपण नॉर्दम्प्टनशायरकडून काउंटी स्पर्धेत खेळणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही २४ जुलैपासून होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. तुषारप्रमाणेच मुंबईचा फिरकी गोलंदाज तनुष कोटियन यालाही या संघात स्थान नाही.

चेन्नई सुपर किंग्जकडून १६ सामन्यांत १५८.३३ च्या सरासरीने ४१९ धावा केलेल्या शिवम दुबेला निवडण्यात आले आहे. त्याने या स्पर्धेत ३५ षटकार मारले होते. शिवमचा चेन्नई संघातील सहकारी अष्टपैलू राजवर्धन हंगर्गेकर याचाही या संघात समावेश आहे. सर्फराझ खान, पृथ्वी, राहुल त्रिपाठी; तसेच अंकित बावणेची निवड होत असताना अर्थातच चेतेश्वर पुजारा या संघात नाही.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

पश्चिम विभाग संघ ः प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी साव, राहुल त्रिपाठी, हार्विक देसाई, हेत पटेल, सर्फराझ खान, अंकित बावणे, समर्थ व्यास, शिवम दुबे, अतित सेठ, पार्थ भूत, शम्स मुलानी, आर्झन नाग्वास्वाला, चिंतन गाजा, राजवर्धन हंगर्गेकर. राखीव ः चेतन सकारिया, तुषार देशपांडे, युवराज दोढिया, अबु काझी, काथन पटेल.

[ad_2]

Related posts