Parth Salunkhe Won Gold Medal In Junior World Archery Championships ; पार्थ साळुंखेने भारतासह महाराष्ट्राचे नाव उंचावले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सातारा : पार्थ सुशांत साळुंखेने भारतासह आता महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. आयर्लंड येथील लिमरीक येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत पार्थ साळुंखे याने सुवर्णपदकाची जागतिक कामगिरी करून तो जुनिअर वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. पार्थ फक्त एवढ्यावर थांबला नाही तर दुहेरीमध्येही त्याने भारताला पदक मिळवून दिले आहे. मिश्र दुहेरी गटात पार्थ बरोबर हरियानाची रिद्धी फोर या दोघांनी मिळून कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे आता पार्थने भारताला जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकून दिली आहेत.

या स्पर्धेत त्याची अंतिम लढत कोरियाचा सॉग इन जून या खेळाडूशी झाली. त्याच लढतीत पार्थ साळुंखे याने ७-३ गुणांनी आघाडी घेतली आणि त्याने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. पार्थ हा खेळाडू साताऱ्याजवळील करंजेपेठचा रहिवाशी असून, त्यांचे वडील सुशांत साळुंखे हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. करंजे पेठ येथील श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्याच्या आई अंजली साळुंखे या याच विद्यालयात ग्रंथपाल म्हणून सेवा बजावत आहेत. पार्थ साळुंखे हा हरियानामधील सोनिपथ येथे प्रशिक्षण घेत असून, त्याचे तेथील प्रशिक्षक राम अवदेस यांच्या मार्गदर्शनात त्यांचा नियमित सराव असतो. त्याच्या या यशस्वी कामगिरीमुळे त्याची आरबीआयमध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

पार्थच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तुषार पाटील यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज शिक्षण प्रसारक संस्थेची आर्चरी अकॅडमी सुरू आहे. संस्थेच्या कोणत्याही शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला तेथे मोफत प्रशिक्षण मिळते. या अकॅडमीचा पार्थ साळुंखे हा आदर्श खेळाडू आहे. तर त्याचे वडील सुशांत साळुंखे हे तेथे मार्गदर्शक म्हणून काम करीत असतात. या यशाबद्दल हितचिंतक, सातारावासीय पार्थ साळुंखेच्याया यशाबद्दलल कौतुक करीत आहेत.

पार्थने आता जागतिक तिरंदाजी स्पर्धेत घवघवीत यश मिळाले आहे. आता यापुढे त्याच्याकडून देशवासियांच्या आशा वाढलेल्या असतील. त्यामुळे आता तो भविष्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts