Sunil Gavaskar Angry on Rohit Sharma Captaincy and Coach Rahul Dravid over Team India Performance; टीम इंडियाचं टीम स्पीरिटच बिघडलं? सुनील गावसकर रोहित शर्मावर भडकल्याने संघातील वाद चव्हाट्यावर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: विराट कोहलीचे कर्णधारपद गेल्यानंतर रोहित शर्माने कसोटीमधील नेतृत्वाची धुरा सांभाळली तेव्हा त्याला अनेक माजी कर्णधारांचा पाठिंबा मिळाला. महान सुनील गावसकरांना त्याच्याकडून खूप आशा होती. विशेषत: टी-२० विश्वचषकाबाबत, कारण रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त होता आणि तो धोनीप्रमाणेच चमत्कार घडवेल असा विश्वास होता. मात्र, तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला. मग डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जे घडले ते कोणापासून लपलेले नाही.

सुनील गावसकरांनी सर्वांनाच ऐकवलं

आता सुनील गावसकर यांनी एकंदर कर्णधारपद आणि कोचिंगबद्दल बोलताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यावर घणाघाती टीका केली. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत क्वालिफाय होऊ शकला नाही, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल भारताने गमावली आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत खराब कामगिरी केली. रोहितच्या कर्णधारपदामुळे गावसकर निराश झाले आहेत. त्यांनी राहुल द्रविड, विक्रम राठोड आणि पारस म्हांब्रे यांच्या कोचिंग स्टाफला फटकारले आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना गावसकर म्हणाले – मला त्याच्याकडून (रोहित) खूप अपेक्षा होत्या. भारतात हे वेगळे आहे, परंतु जेव्हा तुम्ही परदेशात चांगली कामगिरी करता तेव्हा ती खरोखरच कसोटी असते. इथेच त्याची कामगिरी थोडी निराशाजनक झाली आहे. टी-२० फॉरमॅटमध्येही आयपीएलचा सगळा अनुभव असूनही फायनलमध्ये न पोहोचणे, आयपीएलमधील सर्वोत्तम खेळाडू आणि कर्णधार म्हणून शेकडो सामने खेळूनही निराशाजनक कामगिरी केली आहे.

कामगिरीचे पुनरावलोकन केले?

माजी भारतीय कर्णधाराला हे देखील जाणून घ्यायचे होते की निवडकर्ते आणि बीसीसीआयने भारताच्या पराभवाचा योग्य आढावा घेतला आहे का? गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या भारताच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील पराभवाबद्दल बोलताना तो म्हणाला की, प्रशिक्षक द्रविड आणि कर्णधार रोहित यांना त्यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयांचे स्पष्टीकरण विचारायला हवे होते.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

ते म्हणाले – त्याला प्रश्न विचारला पाहिजे, ‘तू आधी क्षेत्ररक्षण का केलेस?’ बरं, नाणेफेकीच्या वेळी ढगाळ वातावरण असल्याचं सांगण्यात आलं होतं. मग प्रश्न असा असावा- शॉर्ट बॉलवर ट्रॅव्हिस हेडच्या कमजोरीबद्दल तुम्हाला माहिती नव्हती? जेव्हा त्याने ८० धावा केल्या तेव्हाच बाउन्सर का? हेड बॅटिंगला येताच रिकी पाँटिंग कॉमेंट्री बॉक्समध्ये म्हणत होता – त्याला बाउन्सर मार…. सगळ्यांना याबद्दल माहित होतं पण आम्ही प्रयत्न केला नाही.

रोहित शर्मा WTC पराभवानंतर तयारीच्या अभावाबद्दल बोललला होता. तो युक्तिवाद गावसकरांना मान्य नव्हता. रोहितला चोख प्रत्युत्तर देताना ते म्हणाले- आपण कोणत्या तयारीबद्दल बोलत आहोत? आता तो वेस्ट इंडिजला गेला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे उदाहरण तुमच्यासमोर आहे. तुम्ही कोणता सामना आता खेळत आहात का? मग ही २०-२५ दिवसांची चर्चा का? जेव्हा तुम्ही तयारीबद्दल बोलता तेव्हा ती गोष्ट खरी करून दाखवा. १५ दिवस अगोदर जा आणि दोन सराव सामने खेळा. प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते, परंतु युवा खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

[ad_2]

Related posts