[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अशा परिस्थितीत बंगाल क्रिकेट असोसिएशनने आता ईडन गार्डन्सवर होणाऱ्या आयसीसी वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या तिकिटांचे दर जाहीर केले आहेत. या सामन्याच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांना किमान ९०० रुपये खर्च करावे लागतील, असे CAB ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका सामना आणि उपांत्य फेरीसाठी तिकीटांची किंमत रु. ९०० (अपर टियर) ते रु. ३,००० (बी, एल ब्लॉक) दरम्यान असेल. या दोन सामन्यांच्या इतर तिकिटांची किंमत १५०० रुपये (डी, एच ब्लॉक) आणि २५०० रुपये (सी, के ब्लॉक) असेल. ईडन गार्डन्सने पाच विश्वचषक सामने आयोजित केले आहेत आणि ६३,५०० आसनक्षमता आहे. बांगलादेश आणि पहिला क्वालिफायर यांच्यातील सामन्यासाठी सर्वात कमी तिकिटाची किंमत रु. ६५० (अपर टियर) असेल.
याशिवाय इतर तिकिटे १००० रुपये (डी आणि एच ब्लॉक) आणि १५०० रुपये (बी, सी, के, एल ब्लॉक) असतील. पाकिस्तानच्या इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या तिकिटांची किंमत रु ८०० (अपर टियर), रु १,२०० (डी, एच ब्लॉक), रु २,००० (सी, के ब्लॉक) आणि रु २,२०० (बी, एल ब्लॉक) असेल.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला सामना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
दुसरा सामना – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, ११ ऑक्टोबर, दिल्ली
तिसरा सामना – भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
चौथा सामना – भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
पाचवा सामना – भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
सहावा सामना – भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
सातवा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर २, २ नोव्हेंबर, मुंबई
आठवा सामना – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
नववा सामना – भारत विरुद्ध क्वालिफायर १, ११ नोव्हेंबर, बेंगळुरू
[ad_2]