India Vs West Indies 1st Test Live Streaming Know How To Watch IND Vs WI Test Series Opener In India On Mobile TV

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India vs West Indies, 1st Test Live Streaming Details : बुधवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. मालिकेचा पहिला कसोटी सामना डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात कऱणार आहेत. भारतीय संघ महिनाभरानंतर मैदानावर उतरणार आहे. 

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. लागोपाठ दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलेय.  यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासारख्या खेळाडूंना स्थान दिलेय तर चेतेश्वर पुजाराला डावलण्यात आलेय. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामने संध्याकाळी सुरु होणार आहेत. 

सामन्याची वेळ काय ? Timing

भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामने सात वाजता सुरुवात होणार आहेत. टी20 सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.

कुठे पाहाल सामना? IND vs WI Broadcasting and Streaming Details

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी, वनडे आणि टी20 सामने डीडी स्पोर्ट्सवर पाहता येतील.. फॅनकोड आणि जिओ सिनेमा या अॅपवरुन तुम्ही सामन्याचा आनंद घ्याल…एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. 

हेड टू हेड रेकॉर्ड –

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 22 सामन्यात विजय मिळवलाय. तर 30 सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. 46 सामने अनिर्णित राहिलेत.  2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ – 

क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डिसिल्वा, शेनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.

[ad_2]

Related posts