IND vs WI 1st Test became Importance For Team India ; शमी, बुमरा, चहरच्या अनुपस्थितीत कशी असेल भारताची गोलंदाजी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डॉमिनिका : भारतीय संघाचा पहिला कसोटी सामान आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. पण यावेळी भारतीय संघाची डोकेदुखी वाढलेली आहे. कारण मोहम्मद शमी, जसप्रीतत बुमरासारखे गोलंदाज या संघात नसतील. त्यामुळे या संघात भारताची गोलंदाजीची भिस्त नेमकी कोणावर असेल आणि कोणाला संधी मिळू शकते, याची माहिती आता समोर येत आहे.

गेल्या दशकात भारतीय क्रिकेट संघाने वेगवान गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे परदेशातील कसोटी मालिकेत यश मिळवले. मात्र, याच गोलंदाजांची कामगिरी उतरणीस लागली आहे. भारतीय संघ स्थित्यंतरातून जात असल्याने नव्या गोलंदाजांची वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत चाचपणी होईल, असे मानले जात आहे.

अद्यापही भारतीय संघात पुनरागमन न केलेला जसप्रीत बुमराह; तसेच मोहमद शमी आणि उमेश यादवच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजांचा विंडीजमध्ये कस लागणार आहे. शमी अजून दोन वर्षे खेळू शकेल; पण उमेश यादवमध्ये आत्मविश्वास जाणवत नाही. बुमराह वर्ल्ड कपसाठी पुनरागमन करील; पण तो त्यानंतरही किती सामने खेळणार हा प्रश्नच आहे. विंडीजमध्ये महंमद सिराज हा प्रमुख गोलंदाज असेल. त्याच्या साथीला नवदीप सैनी आणि मुकेशकुमार आहेत. नवदीपच्या तंदुरुस्तीचा प्रश्न आहे. मुकेशकुमार संघातील स्थानासाठी संघर्ष करीत आहे. यांची जागा घेऊ शकणारा प्रसिध कृष्णा अद्याप तंदुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहे. शिवम मावीने दुलीप स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे; पण तो संघातच नाही. भारताने २००२ पासून विंडीजमध्ये कसोटी गमावलेली नाही. हाच इतिहास कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, वर्ल्ड कपनंतरच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात गोलंदाजांचा कस लागणार आहे. त्यापूर्वीच्या ‘अ’ दौऱ्यातून चांगले पर्याय गवसण्याची आशा आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा , शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

[ad_2]

Related posts