Ind Vs West Test Series 2023 Preview India Vs West Indies Head To Head In Test Cricket Records And Stats Marathi Sports News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IND vs WI 1st Test 2023 Preview : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील पराभवाला मागे टाकत भारतीय संघ पुन्हा मैदानात उतरत आहे. वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात भारतीय संघ करणार आहे. नव्या उमेदीने टीम इंडिया मैदानात उतरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्यांदा न्यूझीलंडकडून आणि यंदा ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता वेस्ट इंडिजविरोधात आपल्या पुढील अभियानाला टीम इंडिया सुरुवात करत आहे. यशस्वी जायस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेशकुमार यासारख्या युवा खेळाडूंना संधी देऊन संघ बांधणीस भारताने सुरुवात केली आहे. नवे खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये कशी कामगिरी करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

दुसरीकडे विश्वचषकातून गाशा गुंडाळल्यामुळे वेस्ट इंडिजवर टीकेची झोड उडाली आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ खेळत नाही, त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्यामुळे भारताविरोधात वेस्ट इंडिजचा संघ आक्रमकपणे उतरेल. क्रैग ब्रॅथवेटच्या नेतृत्वातील वेस्ट इंडिजचा संघ भारतीय संघाला आव्हान देणार आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजला पराभूत करणं, तितके सोपं नाही. कागदावर भारताचा संघ मजबूत वाटत असला तरी घरच्या खेळपट्टयावर विडिंजचा संघ विजय मिळवू शकतो. 

हेड टू हेड – 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 98 कसोटी सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 22 सामन्यात विजय मिळवलाय. तर 30 सामने वेस्ट इंडिजने जिंकलेत. 46 सामने अनिर्णित राहिलेत.  2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरोधात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. 

IND vs WI पहिल्या कसोटीत कोणत्या खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष असेल – 

शुभमन गिल, रविंद्र जाडेजा, विराट कोहली, क्रैग ब्रॅथवेट, चंद्रपॉल, केमर रोच या खेळाडूच्या कामगिरीकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष असेल.  केमर रोच आणि विराट कोहली यांच्यातील सामना पाहण्यासारखा असेल. त्याशिवाय क्रैग ब्रॅथवेट आणि मोहम्मद सिराज यांचाही सामना रंजक असेल. 

कुठे असेल सामना – 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना विंडसर पार्क रोसेउ, डोमिनिका येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 कुठे पाहाल सामना? IND vs WI Broadcasting and Streaming Details

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी, वनडे आणि टी20 सामने डीडी स्पोर्ट्सवर पाहता येतील.. फॅनकोड आणि जिओ सिनेमा या अॅपवरुन तुम्ही सामन्याचा आनंद घ्याल…एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही तुम्हाला याची सविस्तर माहिती मिळणार आहे. 

IND vs WI संभावित प्लेइंग XI:

भारतीय संघ – : रोहित शर्मा (कर्णधार),यशस्वी जायसवाल,  शुभमन गिल,  विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा, ईशान किशन/केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनादकट, मोहम्मद सिराज

वेस्ट इंडीज : क्रैग ब्रॅथवेट (कर्णधार), चंद्रपॉल, रेमन रीफर, रहकीम कॉर्नवाल, जर्मेन ब्लॅकवूड, एलिक अथानाजे, जोशुआ डा सिल्वा (विकेटकीपर), जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, केमार रोच, शैनन गेब्रियल

भारताचा कसोटी संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिजचा कसोटी संघ – 

क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), एलिक अथानाजे, तेजनारायण चंद्रपॉल, रहकीम कॉर्नवाल, जोशुआ डिसिल्वा, शेनन गेब्रियल, जेसन होल्डर, अल्जारी जोसेफ, किर्क मॅकेंजी, रेमन रीफर, केमार रोच आणि जोमेल वारिकन.

[ad_2]

Related posts