Majha Katta Neelam Gorhe Shivsena Maharashtra Politicis Shivsena Uddhav Thackeray

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Neelam Gorhe : महिलांच्या प्रश्नांसंदर्भात भेटण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना वेळ मागत होते. मी सातत्याने मेसेज करायचे, पण कधी उत्तर येत होते तर कधी येत नव्हते. आठ-दहा जणांचे प्रश्न असले की एकालाच भेट मिळायची. या सर्व कार्यपद्धतीला मी थकले होते असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केलं. अशा नेत्याबरोबर काम करणं शक्य नाही. या प्रकियेत मी स्वतःची समजूत काढत होते. शिवसेनेत हे सगळं घडलं नसतं तर मी मृत्यूची वाट बघत होते असं वक्तव्यही गोऱ्हे यांनी केलं. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. नीलम गोऱ्हे यांनी हे वक्तव्य एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये केलं. 

माझ्याकडे मेरिट होतं म्हणून मला डावललं

ज्यावेळी आपल्याला कुठेही जायचे नाही किंवा दुसरीकडे जाण्याची मानसिक शक्ती नाही, त्यावेळीच तुम्ही अत्यंत असमाधानी आहात, तेव्हा वाईट वाटते असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. तुम्ही उपसभापती करता, पण नेता करावसं वाटत नाही. बर मला नेता नाही केलं, पण दुसरी एकही नेता करता येण्यासारखी महिला नाही? असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाला केला. दरम्यान, माझ्याकडे मेरिट होतं म्हणून मला डावलल गेलं. जास्त हुशार माणस नको असं त्यांना वाटत असेल असंही गोऱ्हे म्हणाल्या.

महत्त्वाच्या निर्णयावेळी मत विचारात घेतलं जातं नव्हतं 

पक्षाने मला खूप काही दिले, प्रवक्ता केलं, उपसभापती केलं. पण महत्त्वाच्या निर्णयावेळी मत विचारात घेतलं जातं नव्हतं असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. निर्णय प्रक्रियेत जर आम्हाला बरोबरीचे स्थान नसेल तर त्याला अर्थ काय? असेही गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री झाले, त्यानंतर कोरोनाचं संकट आले, त्यानंतर साहेबांची चर्चेची दारं पूर्ण बंद झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. त्यामध्ये आपण दुखावल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळं आपण आपल्या ओझ्यातून साहेबांना मुक्त करण्याचा विचार अनेकवेळा मनात आल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.

उद्धव  ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही माझी इच्छा होती

उद्धव साहेब मुख्यमंत्री व्हावे ही माझी इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेत गती येईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नसल्याचे नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढं बंदिस्त राजकारण होईल असं वाटलं नव्हतं असे गोऱ्हे म्हणाल्या. त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावले तर मी जाईन. मात्र आता त्याच्या गटात प्रवेश करणार नसल्याचे गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts