Yashasvi Jaiswal Profile ICC Ranking Age Career Info Stats Records Details IND Vs WI Test Match Sports Marathi News Udpate

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yashasvi Jaiswal Profile And Career : मुंबई रणजी संघातील युवा खेळाडू यशस्वी जायस्वाल आज भारतीय कसोटी संघात पदार्पण करणार आहे. यशस्वीचा भारतीय संघात पोहचण्याचा मार्ग सोपा नव्हता. मूळचा उत्तरप्रदेशचा असणारा यशस्वी जायस्वाल क्रिकेटसाठी लहानपणीच मुंबईत आला होता.. त्यावेळी त्याच्या डोक्यावर छतही नव्हते.. खाण्याचेही वांदे असायचे… कठीण परिस्थितीवर मात करत यशस्वीने स्वत:ला सिद्ध केले. यशस्वी जायस्वाल याने मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्ये राजस्थानसाठी खोऱ्याने धावा काढल्या. धावांचा पाऊस पाडल्यानंतर यशस्वीला टीम इंडियाची दारे उघडली. यशस्वी जायस्वाल आज भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. 

यशस्वी जायस्वाल आतापर्यंत इंडिया अंडर-19 ए, इंडिया अंडर-19, इंडिया अंडर-23, फर्स्ट क्लास सामन्यात मुंबईकडून आणि रेस्ट ऑफ इंडियासाठी खेळला आहे. त्याशिवाय आयपीएलमध्ये तो राजस्थान संघाचा सदस्य आहे. 21 वर्षीय जायस्वाल याचा जन्म 28 डिसेंबर 2001 मध्ये उत्तरप्रदेशमधील छोट्या गावात झाला. आता तो भारतीय संघाकडून पदार्पण करत आहे. यशस्वीचा प्रवास अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे.  यशस्वी जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही खेड्यातील एका छोट्याशा दुकानदाराचा मुलगा आहे. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी मुंबई गाठली.  त्यानंतर अनेक दिव्य पार करत आज तो यशाच्या एका अत्युच्य शिखरावर जाऊन पोहोचला आहे. 

यशस्वी जायस्वाल याने विजय हाजरे ट्रॉफी आणि ईरानी चषकात द्विशतक झळकावले आहे. 2019 च्या विजय हजारे चषकात त्याने 203 धावांची खेळी केली होती. 2022-23 मध्ये मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या ईरानी चषकातील सामन्यात 213 धावांची खेळी केली होती. 

आतापर्यंतचे यशस्वी जायस्वालचे करिअर –

यशस्वाली जायस्वाल याने 2019 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले, आतापर्यंत झालेल्या 15 सामन्यातील 26 डावात त्याने 80.21 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 2 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याशिवाय 32 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 54 च्या सरासरीने 1511 धावांचा पाऊस पाडलाय, त्यामध्ये पाच शतके आणि सात अर्धशतके झळकावली.  57 टी 20 सामन्यात 30 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राईक रेटने त्याने 1578 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके ठोकली आहे. 

आयपीएलमध्येही यशस्वी जायस्वाल याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 2020 मध्ये राजस्थानने यशस्वी जायस्वाल याला 2.4 कोटी रुपयात खरेदी केले होते. आतापर्यंत 37 सामन्यात त्याने 33 च्या सरासरीने आणि 149 च्या स्ट्राईक रेटने 1172 धावा काढल्या आहेत. 

आणखी वाचा :

ठरलं! यशस्वी जायस्वाल करणार कसोटीत पदार्पण, गिल तिसऱ्या क्रमांकावर, रोहित शर्मानं दिले संकेत

 



[ad_2]

Related posts