ब्रिटीशकालीन तोफांचा इतिहास आता उद्यानांमध्ये उलगडणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई महापालिकेच्या उद्यानात आता ब्रिटिशकालीन तोफा दिसणार आहेत. घाटकोपर पश्चिमेला असणारे डॉ. केशव बळीराम हेडगेवार उद्यान आणि घाटकोपर पूर्वेला असणारे ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ या उद्यानांमध्ये या तोफा पुनर्स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या उद्यानाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

मुंबईच्या संरक्षणासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसवल्या होत्या. यापैकी तब्बल १६७ वर्षे जुन्या दोन तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये काही वर्षांपूर्वी आढळून आल्या होत्या. या दोन्ही तोफांची आता पुनर्स्थापना करण्यात आली आहे.

या तोफांना पुनर्स्थापित करताना किल्ल्यांच्या बुरुजाशी साधर्म्य साधणारे चबुतरे तयार करण्यात आले असून त्यावर या तोफा बसवण्यात आल्या आहेत, असे पालिकेचे पुरातन वास्तू जतन अभियंता खात्याचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी सांगितले.

‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या नोंदी
‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा घेर हा ०.६४ मीटर आणि बाहेरील चाकांचा घेर १.१७ मीटर इतका आहे. या दोन्ही तोफांवर सन‌ १८५६ या‌ वर्षाची नोंद असून एका बाजूला रोमन लिपी मध्ये ‘एन सी पी सी’ अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत, असेही ते म्हणाले.


हेही वाचा

ठाण्यातील मिट्रॉन लाउंज सील, क्रिकेटपटूही लाउंजमध्ये होता उपस्थित

मुलुंडमधील ‘या’ ठिकाणी पालिका स्कायवॉक बनवणार

[ad_2]

Related posts