Msrtc Will Run Shivneri Bus As Jan Shivneri Bus In Reasonable Ticket Fare In Various Part Of Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ST Shivneri Bus:  मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या शिवनेरी बसेस आता महाराष्ट्रातील इतर मार्गावरही चालवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या शिवनेरी बसचे प्रवास भाडे हे  शिवशाही बस इतकं असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास करता येणार आहे. सध्या जन-शिवनेरी बस ही प्रायोगिक तत्वावर नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गादरम्यान चालवण्यात येत आहे. त्याला प्रवाशांची चांगलाच प्रतिसाद दिला आहे.  

येत्या काळात मुंबई-पुणे मार्गावर धावत असलेल्या शिवनेरी बसेस ऐवजी ई-शिवनेरी बसेस धावणार आहेत. त्यामुळे तब्बल 100 शिवनेरी बसेस या महाराष्ट्रातील इतर मार्गावर जन-शिवनेरी या नावाने चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे शिवनेरी बसचे तिकीट दर हा 16 रुपये 80 पैसे प्रति टप्पा (2.80 रुपये/किमी)  इतका आहे. ‘जन शिवनेरी’साठी तो 12:90 रुपये प्रति टप्पा इतका (म्हणजे रू 2/किमी) ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई वगळता महाराष्ट्र इतर शहरादरम्यान धावणाऱ्या जन-शिवनेरी या बसेस सध्याच्या शिवशाही बसच्या जवळपास तिकीट दरात धावणार आहेत. 

एसटीच्या “जन-शिवनेरी” ला  प्रवाशांचा चांगला प्रतिसाद

अत्यंत सुरक्षित, अत्याधुनिक सेवा-सुविधांनी युक्त असलेली वातानुकूलित शिवनेरी बससेवा मुंबईच्या बाहेर “जन-शिवनेरी” या नावाने चालविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्वावर नाशिक-पुणे (शिवाजीनगर) मार्गावर 10 जुलैपासून विनावाहक सुरू करण्यात आलेली या “जन-शिवनेरी” बससेवेला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.

वोल्वो आणि स्कॅनिया या कंपनीच्या अत्याधुनिक शिवनेरी बसेस अत्यंत माफक दरामध्ये नाशिक-पुणे (शिवाजीनगर) या मार्गावर “जन-शिवनेरी” या नावाने धावत आहेत. दिवसभरात त्यांच्या 18 फेऱ्या होतात. या बसचे नाशिक-पुणे (शिवाजीनगर) प्रवासाचे भाडे 500 रुपये असून महिलांना 50 टक्के सवलतीमुळे केवळ 255 रुपयांत या अत्याधुनिक, सुरक्षित आणि वातानुकूलित बससेवेचा लाभ घेणे शक्य झाले आहे. लवकरच राज्यातील इतर काही मार्गावर “जन-शिवनेरी”   ही सर्वसामान्यांसाठी माफक दरातील अत्याधुनिक व वातानुकूलित बससेवा सुरु करण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे. 

आषाढी यात्रेत एसटीला मिळाले 28 कोटींचं उत्पन्न

आषाढी यात्रा कालावधीत एसटी महामंडळाला (MSRTC) तब्बल 27 कोटी 88 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. आषाढी यात्रेत तब्बल 8 लाख 81 लाख वारकऱ्यांनी लालपरीतून प्रवास केला असून सोलापूर विभागाला 48 लाख 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या आषाढी यात्रेत सुमारे 5 हजार बसेसचे नियोजन महामंडळाने केले होते. आषाढी सुरु झाल्यापासून म्हणजे 25 जून ते 3 जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागातून 17 हजार 500 फेऱ्या करुन आणि 47050 किलोमीटर प्रवास करत लालपरीने 8 लाख 81 हजार वारकऱ्यांची वाहतूक केली होती. 

इतर संबंधित बातमी:

[ad_2]

Related posts