Kavya Maran SRH Owner Got Emotional On Henrich Klaasen Century on Home Ground SRH vs RCB IPL 2023; हेनरिक क्लासेनने शतक झळकावताच SRH मालकिणीची रिअ‍ॅक्शन चर्चेत, इमोशनल झाली काव्या मारन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हैदराबाद: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने गुरुवारी आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात यजमान सनरायझर्स हैदराबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. हैदराबादचा हा या मोसमातील घरच्या मैदानावरील शेवटचा सामना होता, पण या सामन्यात हैदराबादच्या संघाला विजय मिळवता आला नाही. हेनरिक क्लासेनने सामना संस्मरणीय करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. क्लासेने शानदार शतक ठोकले, पण विराटनेही त्याच शैलीत शतकी प्रत्युत्तर देत हैदराबादच्या चाहत्यांची निराशा केली. ५१ चेंडूत ६ षटकार आणि ८ चौकारांसह १०४ धावा ठोकणाऱ्या क्लासेनच्या शतकानंतर सनरायझर्स हैदराबादची मालकिण काव्या मारन भावूक झाली.पहिल्या डावातील १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हर्षल पटेलने क्लासेनच्या डोक्यावरून षटकार मारला. त्यानंतर त्याचे सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. तेव्हाच कॅमेऱ्याचे लक्ष प्रेक्षकांपाठोपाठ काव्या मारनवर आले. आपल्या संघाच्या खेळाडूच्या शतकाने काव्या भावूक दिसली. कॅमेऱ्याने तिच्यावर फक्त काही सेकंद लक्ष केंद्रित केले, पण पाणवलेले डोळे सर्वकाही सांगण्यासाठी पुरेसे होते.

सनरायझर्सने तत्पूर्वी, हेन्रिक क्लासेनच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर ५ बाद १८६ धावा केल्या होत्या आणि मार्करामच्या (१८) तिसर्‍या विकेटसाठी ७६ आणि हॅरी ब्रूकच्या (नाबाद २७) चौथ्या विकेटसाठी ७४ धावा केल्या होत्या. आरसीबीने १८७ धावांचे लक्ष्य १७२ धावांत पार केले. विराट कोहली (६३ चेंडूत १०० धावा, १२ चौकार, ४ षटकार) आणि कर्णधार फाफ डुप्लेसी (७१ धावा, ४७ चेंडू, ७ चौकार आणि २ षटकार) यांच्यात पहिल्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली. ४ चेंडू शिल्लक असतानाच १८७ धावा करत आरसीबीने विजय मिळवला.


सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्कराम म्हणाला की क्लासेनसाठी सामना जिंकू न शकल्याने निराश झालो. तो म्हणाला, ‘आम्हाला हेनरिकसाठी सामना जिंकायचा होता, पण आम्ही ते करू शकलो नाही.’ सनरायझर्सच्या कर्णधाराने सांगितले की कोहली आणि डु प्लेसिसच्या भागीदारीने सामना त्यांच्या आवाक्याबाहेर गेला. मार्करामने सीझनमधील शेवटच्या घरच्या सामन्यासाठी स्टेडियमवर आलेल्या चाहत्यांचे कौतुक केले.

[ad_2]

Related posts