Yashasvi Jaiswal Breaks Sachin Tendulkar Big Record in Debut Match of WI vs IND 1st Test; ‘यशस्वी’ कामगिरी! मैदानावर पाऊल ठेवताच थेट सचिनचा विक्रम मोडला, शुभमन गिलही पडला मागे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डॉमिनिका: मुंबईचा झंझावाती फलंदाज यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघात पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून आपली जागा निर्माण केली आहे. त्याने पहिल्याच कसोटीत रोहित शर्मासोबत सलामीसाठी उतरला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणातच त्याने मोठा टप्पा गाठला. त्याने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडला, तर त्याचा सहकारी शुभमन गिललाही त्याने मागे टाकले.

नावाप्रमाणेच यशस्वी जैस्वाल क्रिकेटच्या जगतात नक्कीच खूपच यशस्वी होणार याची चिन्हे स्पष्टपणे पावलोपावली दिसत आहेत. पदार्पणातच तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तिसरा सर्वोच्च सरासरी असलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत महान सचिन तेंडुलकर आणि शुभमन गिल यांना मागे टाकले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी ८०.२१ आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या संघात पहिल्यांदाच यशस्वी जैस्वालचा संघात समावेश करण्यात आला आणि त्याला भारताकडून पदार्पण करायला वेळ लागला नाही. कर्णधार रोहित शर्माकडून त्याला कॅप मिळाली. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या फायनलसाठी तो स्टँडबाय खेळाडू म्हणून भारतीय संघाचा भाग होता. देशांतर्गत सर्किटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर यशस्वीने भारतीय संघात स्थान मिळवले.


यशस्वी अल्पावधीतच मुंबई रणजी संघाचा अविभाज्य भाग बनला. त्याने एकूण १५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८०.२१ च्या सरासरीने १८४५ धावा केल्या, त्याच्या नावावर ९ शतके आहेत. विनोद कांबळी हा त्याच्या कसोटी पदार्पणापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेला फलंदाज आहे. त्यांच्या पश्चात प्रवीण अमरे आणि यशस्वी जैस्वाल यांचा क्रमांक लागतो. आर. मोदी, सचिन तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचाही या विशेष यादीत समावेश आहे.

फलंदाज सरासरी सामने
विनोद कांबळी ८८.३७ २७
प्रविण आंब्रे ८१.२३ २३
यशस्वी अग्रवाल ८०.२१ १५
आर. मोदी ७१.२८ ३८
सचिन तेंडुलकर ७०.१८
शुभमन गिल ६८.७८ २३

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

उल्लेखनीय म्हणजे पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी जैस्वालने ४० धावा केल्या आहेत. त्याने ७३ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. त्याच्यासोबत रोहित शर्माने ३० धावा करताना ६५ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार ठोकला. हे दोन्ही फलंदाज नाबाद असून आज त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.



[ad_2]

Related posts