Yashasvi Jaiswal Made History With His Maiden Century In Debut ; यशस्वी जैस्वालने पहिल्याच शतकासह रचला इतिहास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डॉमिनिका : यशस्वी जैस्वालने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आणि आपल्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताकडून पदार्पणात पहिले कसोटी शतक हे लाला अमरनाथ यांनी १९५५ साली झळकावले होते. त्यानंतर यशस्वी हा पदार्पणात शतक झळकावणारा १७ वा खेळाडू ठरला आहे.

आपली निवड किती सार्थ आहे हे यशस्वीने दाखवून दिले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी यशस्वीने सर्वाधिक ४० धावा केल्या होत्या. यशस्वी यावर समाधानी नव्हता. कारण दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये धावांची भूक दिसत होती. दुसऱ्या दिवशी सावध खेळ करत यशस्वीने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर यशस्वी हा बिनधास्त खेळताना दिसला. त्याच्यावर यावेळी जास्त दडपण नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यशस्वीने यावेळी चौफेर फटकेबाजी केली आणि पहिल्याच कसोटी सामन्यात आपले शतक झळकावले. वेस्ट इंडिजमध्ये पदार्पण करताना पहिल्याच सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

एकाच चेंडूवर एक भन्नाट योगायोग यावेळी सर्वांना पाहायला मिळाला. यशस्वीने दुसऱ्या दिवसाची सुरुवात थोडी शांतपणेच केली. पहिल्या दिवशी मात्र त्याने धडाकेबाज फटकेबाजी केली होती. पण दुसऱ्या दिवसाची सुरुवात मात्र त्याने संयतपणे केली. सुरुवातीला त्याने संयमावर भर दिला. पण स्थिरस्थावर झाल्यावर मात्र त्याने दमदार फटकेबाजी केली. यावेळी यशस्वीने ३३ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वीने दमदार फटका लगावला. लेग साइडला त्याने अचूक टायमिंगच्या सहाय्याने फटका मा़रला आणि चार धावा वसूल केल्या. या चार धावांच्या जोरावर यशस्वीने आपले पहिले अर्धशतकही साजरे केले. पण त्याच्या या अर्धशतकाबरोबर संघाचे शतकही झाल्याचे पाहायला मिळाले. कारण हा फटका मारण्यापूर्वी भारतीय संघाच्या ९९ धावा झाल्या होत्या. यशस्वीने चौकार मारला आणि त्यामुळे भारताचे शतक यावेळी पूर्ण झाले. त्यामुळे एकाच चौकाराच्या जोरावर यशस्वीचे अर्धशतक आणि भारतीय संघाचे शतक पाहायला मिळाले.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

यशस्वीने आपल्याला मिळालेल्या संधीचा चांगलाच फायदा उचलला. पहिल्याच सामन्यात त्याने आपले शतक साजरे केले आहे. त्यामुळे आता या दौऱ्यात तो यापुढे कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts