Return seema haider to us or face 26-11-like attack mumbai police receives threat call

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सीमा हैदर (Seema Haider) प्रकरण सध्या संपूर्ण देशात चर्चेत आहे. सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेने तिच्या चार मुलांसह भारत गाठले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथे राहणाऱ्या सचिनच्या प्रेमात ती पडली. सचिनसोबत नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी ती नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आली.

मात्र, या लव्हस्टोरीमुळं संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तर, पाकिस्तानातूनही तीव्र विरोध होत आहे. सीमा पाकिस्तानात परतली नाही तर भारतात 26/11 प्रमाणे हल्ले होतील, असे धमकीवजा इशारा मुंबई पोलिसांना आला आहे. 

मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रुमला हा धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. फोन करणारा व्यक्ती हा उर्दू भाषेतून बोलत होता. जर सीमा हैदर पाकिस्तानात परतली नाही तर भारताचा नाश होईल, अशी धमकी देण्यात आली आहे.

तसंच, 26/11प्रमाणे दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, याकरता उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असेल, असंही धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटलं आहे. 12 जुलै रोजी पोलिसांना हा फोन आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी लगेचच तपास सुरु करुन कारवाईला सुरुवात केली आहे. 

[ad_2]

Related posts