Shukra Vakri 2023 : शुक्र वक्रीमुळे 7 दिवसांनी ‘या’ 6 राशींचं राजासारख आयुष्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Venus retrograde 2023 in Cancer : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाची आपली अशी वैशिष्ट्य आहेत. शुक्र ग्रह धन, कीर्ती, विलास, संपत्तीचा कारक मानला जातो. ज्या जाचकांच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान असतो त्या व्यक्ती काम पैशात खेळतो असं म्हणतात. आता लवकरच शुक्र ग्रह आपली स्थिती बदल आहे. येत्या  23 जुलैला  सकाळी 6.01 वाजता कर्क राशीत शु्क्र मागे फिरणार आहे. 

शुक्र वक्रीमुळे 12 राशीवर शुभ अशुभ परिणाम होणार आहे. पण 7 दिवसांनी  6 राशींच्या आयुष्यात अमाप धनसंपदा प्राप्त होणार आहे.  यात तुमच्या राशीचा समावेश आहे का जाणून घ्या. (venus retrogrades after 7 days will give money happiness luxury shukra vakri 2023 in kark)

तुमच्या नशिबात अमाप पैसा?

वृषभ (Taurus)

या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. त्यामुळे शुक्र वक्री या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या काळात करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येणार आहे. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न असेल. बिझेनसमध्ये मोठ्या फायदा होणार आहे. 

तूळ (Libra)

तूळ राशीचा पण स्वामी शुक्र ग्रह असल्याने शुक्र वक्री या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. कर्क राशीत शुक्र ग्रह मागे फिरल्यामुळे या राशीच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात धनलाभाचे योग आहेत.  या काळात तुमचे नाते संबंध मजबूत होणार आहेत. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमची प्रशंसा होणार आहे. कौटुंबिक आणि करिअर दोघांमध्येही आनंदाचं वातावरण असणार आहे. 

कन्या (Virgo) 

शुक्र वक्री ही कन्यासाठीसाठी आर्थिक फायदा घेऊन येणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. परदेशात जाण्याचे योग आहेत. वडिलांकडून तुम्हाला सहकार्य लाभणार असल्याने तुम्ही आनंदी असाल. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा दोन्ही तुमच्या नशिबात आहे. आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत स्थितीत असल्याने तुम्ही आनंदी असाल. 

 

मकर (Capricorn) 

या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील 7व्या घरात शुक्राचा ग्रह असणार आहे. त्यामुळे या लोकांना तो लाभदायक ठरणार आहे. आर्थिक फायद्यासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे. नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. तुमचं सर्वत्र कौतुक करणार आहे. या काळात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरणार आहे. 

वृश्चिक (Scorpio)

शुक्र वक्री वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला प्रत्येक कामात उत्तम यश मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वास वाढणार आहे. अचानक धनलाभ होणार असल्याने तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होणार आहात. 

मीन (Pisces) 

शुक्र वक्रीमुळे मीन राशीच्या लोकांना धनसंपदासोबत नशिबाची साथ मिळणार आहे. तुमच्या कल या दिवसांमध्ये अध्यात्माकडे राहणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार असून बढती आणि पगार वाढीचे संकेत आहेत. कुटुंबात शुभ कार्य ठरणार असल्याने आनंदी वातावरण असेल. 

 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts