Pm Modi Leaves For Uae After Two Day Visit To France Will Meet President Sheikh Bin Zayed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi UAE Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पहाटे संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर (PM Modi France Visit) युएई (UAE) साठी रवाना झाले आहेत. संयुक्त अरब अमिराती (President of the United Arab Emirates) ते राष्ट्रपती शेख बिन जायद (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांची भेट घेतील. युएईसाठी रवाना होण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, माझा युएई दौरा आमच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीतील एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल. भारत आणि UAE फिनटेक संरक्षण सुरक्षा आणि ऊर्जा यासह विविध क्षेत्रात एकत्र मिळून काम करत आहेत.

पंतप्रधान मोदी संयुक्त अरब अमिरातीसाठी रवाना

फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा फ्रान्स दौरा संस्मरणीय झाल्याचं सांगितलं आहे. बॅस्टिल डे सोहळ्यात सहभागी झाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि फ्रान्सच्या लोकांचे प्रेम आणि आदरातिथ्य याबद्दल आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “हा फ्रान्स दौरा संस्मरणीय ठरला. मला बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होता आल्यामुळे हा दौरा आणखी खास झाला.”

दोन दिवसीय फ्रान्स दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी शुक्रवारी 14 जुलै रोजी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. मॅक्रॉन यांच्यासोबतच्या संवादक परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि फ्रान्स दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र आहेत. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून हजेरी लावली. या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यातील विविध करारांवर चर्चा झाली.

भारतीय UPI द्वारे फ्रान्समध्येही व्यवहार

पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की, भारत आणि फ्रान्समध्ये भारताचा ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (UPI) उपलब्ध करून देण्यासाठी करार झाला आहे. असे करणारा फ्रान्स हा पहिला युरोपीय देश आहे. संरक्षण मंत्रालयाने 13 जुलै रोजी फ्रान्सकडून राफेल जेटचे 26 नौदल प्रकार आणि तीन फ्रेंच-डिझाइन स्कॉर्पीन श्रेणीच्या पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘संरक्षण सहकार्य हा आमच्या घनिष्ठ संबंधांचा मजबूत आधारस्तंभ आहे. हे दोन्ही देशांमधील विश्वासाचं प्रतीक आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमात फ्रान्स महत्त्वाचा भागीदार आहे.



[ad_2]

Related posts