Lenovo Tab M10 5G Launch In India Know Features , Price And Look In Detail News Marathi Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lenovo Tab M10 5G Launch In India : Lenovo ने भारतात  Tab M10 5G नवीन टॅब्लेट तुमच्या बजेट मध्ये लाँच केला आहे. हा टॅब्लेट दोन व्हेरिएंट मध्ये लाँच करण्यात आला आहे. टॅब्लेट चे बेस माॅडेल हे  4GB RAM आणि 128GB स्टोरेज सहित आहे . तर दुसरे माॅडेल हे 6GB RAM आणि 128GB स्टोरेज सहित उपलब्ध होणार आहे. Lenovo हे  इंडिया च्या अधिकृत वेबसाइट आणि Lenovo च्या स्टोरअवर देखील उपलब्ध असेल. 

Lenovo ने भारतात एक नवीन Android टॅब्लेट लाँच केला आहे. नवीन  Tab M10 5G लाँच करून कंपनीने देशात आपला 5G Android टॅब्लेट पोर्टफोलियो वाढवला आहे. नवीन लीनोवो टॅब्लेट मध्ये काही माध्यम श्रेणी वैशिष्ट्ये आहेत . यात QUALCOMM SNAPDRAGON os, एक मोठ्या आकाराचा डिसप्ले आणि 7700mAh बॅटरी आहे . या टॅब्लेट ची स्पर्धा ही Xiomi Pad 6 शी आहे , जो भारतात वर्षाच्या सुरूवातीस लाँच करण्यात आला होता . 

Lenovo Tab M10 5G किंमत     

लीनोवो ने भारतात Tab M10 5G हा दोन स्टोरेज  मध्ये लाँच केलेला आहे . टॅब्लेटचा बेस मॉडेल  4GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला आहे. त्याची किंमत 24,999 रुपये आहे . तर Tab M10 5G 6GB RAM आणि 128GB स्टोरेज हा प्रकार देखील आहे .Tab M10 5G हा Aamazon आणि Flipkart वर ही आता खरेदी साठी उपलब्ध आहे.

Lenovo Tab M10 5G वैशिष्ट्य

Lenovo Tab M10 5G फ्लॅट फ्रेम डिजाइनसह मिळेल. हा सिंगल अबियस्स ब्लु कलर मध्ये असेल .मागील बाजूला सिंगल कॅमेरा सेन्सॉर आणि फ्लॅगशिप फ्लॅश आहे. विषेशत: टॅब्लेटमध्ये टाइप सी पोर्ट आणि 3.5 mm हेडफोन जॅक देखील आहे .तसेच टॅब M10 5G मध्ये स्कूलपेड notch देखील आहे . या मध्ये 1200 x 1200 पिक्सेल असा 10.6 इंचाचा डिसप्ले आहे. Lenovo Tab M10 5G वरील स्क्रीन 60Hz रीफ्रेश रेट  आणि 400 nits पीक ब्राइटनेस देते. टॅबलेट Qualcomm Snapdragon 695 SoC प्रोसेसरसह येतो. टॅब्लेटमध्ये 7700mAh बॅटरी देखील आहे, जी 12 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक किंवा 11 तासांचा ब्राउझिंग वेळ वितरीत करण्याचा दावा केला जातो. यामध्ये कोणत्याही फास्ट चार्जिंगचा दावा कंपनीने केलेला नाही. टॅब M10 5G चे वजन सुमारे 490 ग्रॅम आहे आणि त्याची जाडी 8.30 मिमी आहे. 

टॅबलेट दोन स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे . बेस मॉडेल 4GB RAM आणि 128GB स्टोरेज तर दुसरे मोडेल हे 6GB RAM आणि 128GB स्टोरेज . सोबतच मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज तु्म्ही वापरू शकता. टॅब्लेटमध्ये नॅनो-सिम कार्ड स्लॉट देखील आहे. मागील बाजूस, एलईडी फ्लॅशसह 13MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, टॅब M10 5G मध्ये 8MP फ्रंट कॅमेरा आहे. टॅबलेट M10 5G ब्लूटूथ 5.1 ला  सपोर्ट करतो आणि हा  Android 13 वर चालतो.

टॅब्लेट खरेदी करताना होणारे नुकसान आणि दुरुस्ती खर्चाचा त्रास टाळण्यासाठी ग्राहक लेनोवो अॅक्सिडेंटल डॅमेज प्रोटेक्शन वन आणि लेनोवो प्रीमियम केअर प्लस सारख्या स्मार्ट सेवांचा देखील लाभ घेऊ शकतात.

इतर महत्वाच्या बातम्या

Cassette Player : आता कॅसेटची गाणी रेकॉर्डिंगला डिजीटल फॉर्मेटमध्ये बदला; ‘हे’ आहेत टॉप 5 Converter

[ad_2]

Related posts