[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
यशस्वीने पहिल्याच कसोटीत १७१ धावांची खेळी केली आणि सामनावीर पुरस्कार मिळवला. यशस्वीच्या या कामगिरीची सर्वत्र चर्चा सुरू असताना तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चे आला आहे. गेल्या काही वर्षापासून मैदान गाजवणाऱ्या यशस्वीने त्याच्या कुटुंबाला एक स्पेशल गिफ्ट दिले आहे.
एकेकाळी झोपडीत राहणाऱ्या आणि पाणीपुरी विकून कुटुंबाला मदत करणाऱ्या यशस्वीने मुंबईत ५ बीएचकेचे घर घेतले आहे. इतक वर्ष यशस्वी आणि त्याचे कुटुंबीय सांताक्रूझमधील भाड्याच्या घरात राहत होते. आता त्याने मुंबईत स्वत:चे घर घेतले आहे. यशस्वीच्या भावाने ही माहिती दिली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, तो आम्हाला सांगतोय की लवकरात लवकर नव्या घरात राहण्यास जा. मला आता या घरात रहायचे नाही. पहिली कसोटी मॅच खेळत असताना देखील तो आम्हाला फोनवरून नव्या घरात राहण्यास कधी जाणार याबद्दल विचारत होता. त्याचे सर्वात मोठे स्वप्न होते की स्वत:चे एक घर असावे. आता ते त्याला मिळाले आहे आणि ते देखील मुंबई सारख्या शहरात, असे यशस्वीचा भाऊ तेजस याने सांगितले. यशस्वीने खरेदी केलेल्या घराची किंमत नेमकी किती आहे हे समजू शकले नसले तरी त्याची किंमत काही कोटींमध्ये असल्याची चर्चा आहे.
यशस्वी जेव्हा मुंबईत परत येईल तेव्हा त्याला कुटुंबातील सर्वजण नव्या घरात राहण्यास आलेले पहायचे आहेत, असे ही त्याच्या भावाने सांगितले.
आयपीएल २०२३ मध्ये यशस्वीने धमाकेदार फलंदाजी केली होती. त्यानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत पदार्पणात दीड शतकी खेळी करून त्याने कमाल करून दाखवली. यशस्वीने पहिल्या डावात ३७८ चेंडूत १६ चौकार आणि १ षटकारासह १७१ धावा केल्या. भारताकडून कसोटीत पदार्पणाच्या डावात शतक करणारा तो १८वा खेळाडू ठरला आहे.
[ad_2]