( प्रगत भारत । pragatbharat.com)
Surya gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात एका विशिष्ट वेळेनंतर प्रत्येक ग्रह त्याची राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. आज पहाटे सूर्याचं गोचर झालं आहे. सूर्याने यावेळी कर्क राशीत प्रवेश केलाय तर 17 ऑगस्ट रोजी दुपारी 13.27 पर्यंत असणार आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जो सूर्याचा मित्र मानला जातो. अशा स्थितीत सूर्याच्या गोचरमुळे 4 राजयोग निर्माण झालेत.
वैदिक ज्योतिषात, सूर्य देवाला ग्रहांचा राजा मानलं जातं. सूर्य देवाचे गोचर संक्रमण पिता, आत्मा, प्रशासन, नोकरी आणि सन्मान यांच्याशी संबंधित परिणाम देणार आहे. कर्क राशीत सूर्याच्या गोचरमुळे 4 राजयोगही तयार होणार आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना याचा अफाट फायदा मिळणार आहे.
वृषभ रास
कर्क राशीत सूर्य देवाचा प्रवेश वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. सूर्यदेव तुमच्या संक्रमण तक्त्यातील चौथ्या घराचा स्वामी आहे आणि तिसऱ्या घरात प्रवेश केलाय. यामुळे तुमच्या कुंडलीत शश महापुरुष राजयोग आधीपासूनच आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात विशेष यश मिळू शकते. कुटुंबातील समस्या दूर होतील.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्याचं गोचर शुभ सिद्ध होऊ शकते. सूर्य तुमच्या राशीच्या बाराव्या घराचा स्वामी असून अकराव्या भावात भ्रमण करतयो. तुमच्या राशीचा स्वामी बुधही याच ठिकाणी असून बुद्धादित्य योग तयार झालाय. त्यामुळे या राजयोगाने तुम्हाला परदेशातून मोठी कमाई होऊ शकते. नोकरदारांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते.
वृश्चिक रास
सूर्य देवाचा राशी परिवर्तन तुमच्यासाठी लाभदायक आहे. या परिस्थितीत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, या काळात तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागेल. करिअरसाठी ते खूप फायदेशीर ठरेल. घरात किंवा कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ मिळेल.
कुंभ रास
सूर्याच्या गोचरमुळे सूर्य आणि बुध तुमच्या राशीतून सहाव्या भावात प्रवेश करतोय. याचा तुम्हाला आर्थिक फायदा मिळणार आहे. या काळात तुम्हाला रोग आणि कर्जापासून मुक्ती मिळू शकणार आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळेल. नोकरदारांना या काळात चांगल्या संधी मिळतील. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )