Big Blow For Asia cup 2023, Pakistan Made New Demand ; Asia Cup 2023 पुन्हा एकदा संकटात, पाकिस्तानने आता कोणता हट्ट धरला आहे जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कराची : आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धा पुन्हा अनिश्चिततेच्या भोवऱ्यात जात आहे. स्पर्धा कार्यक्रमाची प्रतीक्षा असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धेतील चारपेक्षा जास्त सामने पाकिस्तानता हवेत, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे स्पर्धा पुन्हा संकटात येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेबाबत आज रविवारी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक होणार होती. पण त्यानंतर याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा संकटात आली असल्याचे म्हटले जात आहे.

आशिया कप वन-डे स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान होईल हे आशियाई क्रिकेट परिषदेने जाहीर केले आहे; पण अजून स्पर्धा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. ही स्पर्धाहायब्रिड मॉडेलनुसार होईल. त्यानुसार स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानात, तर नऊ लढती श्रीलंकेत घेण्याचे ठरले आहे; मात्र पाकमध्ये चारपेक्षा जास्त सामन्यांचे आयोजन व्हावे, यासाठी पाक बोर्डाचे प्रमुख झाका अश्रफ यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत आग्रह केला असल्याचे समजते.
स्पर्धा होणार असलेल्या कालावधीत श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. त्यामुळे तेथील सामन्यांबाबत खूपच अनिश्चितता आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सामने वाढवण्याची गरज आहे, अशी पाकची भूमिका आहे. स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित झाला त्या वेळी नजम सेठी पाक बोर्डाचे अध्यक्ष होते. आता त्यांच्याऐवजी झाका अश्रफ अध्यक्ष झाले आहेत.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

आशिया कप स्पर्धेतील पाकमध्ये होणाऱ्या लढती लाहोरला अपेक्षित आहेत. अश्रफ यांना लाहोरप्रमाणे मुलतान आणि अन्य ठिकाणीही सामने हवे आहेत. मुलतानचे स्टेडियम तुलनेत लहान आहे. त्यामुळे सामन्यांस कमी प्रतिसाद लाभला तरी स्टेडियम हाउसफुल असल्याचे चित्र निर्माण होईल, असा अश्रफ यांचा विचार आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये जास्त सामने व्हावेत, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे आता श्रीलंकेतील काही सामने पाकिस्तानमध्ये हलवणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल. त्यामुळे आता आशिया चषक स्पर्धेच्या वेळापत्रकामध्ये काय आणि कसा बदल होतो, याकडे आता तमाम क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.

[ad_2]

Related posts