Jjasprit Bumrah Has Increased Indian Team’s Headache ; जसप्रीत बुमरामुळे कशी वाढली आहे भारतीय संघाची डोकेदुखी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डॉमिनिका : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा नेमका करतोय तरी काय, हा प्रश्न आता चाहत्यांना पडलेला आहे. कारण तो नेमका कुठे आहे, काय करतो आणि त्याच काय चाललंय हे सामान्य चाहत्यांना माहिती नाही. कारण बराच काळ तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. प्रत्येक खेळाडूगणित प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाचे काही प्लॅन्स असतात. पण बुमरा फिट नसल्यामुळे मात्र संघाची रणिनिती फिस्कटच चालली आहे. बुमरामुळे संघधाच्या नेमक्या कोणत्या गोष्टी अवघड झाल्या आहेत, हे आता भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी मांडले आहे.

“मोसमातील आव्हान लक्षात घेतल्यास गोलंदाजांवरील भार कमी कसा करता येईल, हे प्रमुख आव्हान आहे. जसप्रीत बुमराह संघाबाहेर असल्यामुळे हे काम जास्तच अवघड झाले आहे,” असे भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांनी सांगितले.

“कसोटी सामन्यात कोण गोलंदाज असणार आणि मर्यादित षटकांच्या लढतींसाठी कोण याचा आम्ही विचार केलेला नाही; मात्र सुमारे दीड वर्ष बुमराह संघाबाहेर आहे. त्यामुळे गोलंदाजांवरील भार नियमन अवघड झाले आहे. अर्थात मोसमातील सामन्याची संख्या लक्षात घेतल्यास गोलंदाजांना पुरेशी विश्रांती आवश्यक आहे,” असे म्हाम्ब्रे यांनी सांगितले.

“मुकेश रणजी स्पर्धेत चांगली कामगिरी करीत आहे. भारतीय संघासोबत असलेल्या अवेश खान आणि अर्शदीपसिंग यांना संधी देण्याबाबत विचार सुरू आहे. आशिया कप आणि वर्ल्ड कप लागोपाठ असताना गोलंदाजांचे नियोजन मोलाचे आहे. बुमराह आणि प्रसिध कृष्णाची उणीव जाणवत आहे. गोलंदाजांच्या निवडीबाबत आम्ही कर्णधार; तसेच संघव्यवस्थापनासह सातत्याने चर्चा करीत आहोत,” असेही म्हाम्ब्रे म्हणाले.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक पार म्हाम्ब्रे यांनी आपली भूमिका मांडली आहे. या सर्व गोष्टींवरून एका खेळाडूमुळे संपूर्ण संघाचे कसे नुकसान होऊ शकते किंवा त्याच्यानुसार रणनिती कशी बदलावी लागते, हे आता सामान्य चाहत्यांना समजू शकते. त्यामुळे आता बुमरा लवकर फिट होऊन संघात परतेल, अशी आशा चाहत्यांना नक्कीच असेल.

[ad_2]

Related posts