[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील जिलॉन्गमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नुकतेच फेसबुक ग्रुपवर तिच्या घराबाहेरील काही फोटो पोस्ट केले आणि लोकांना विचारले की ते काय आहे. महिलेने सांगितले की तिच्या घराबाहेर पोस्ट बॉक्स आणि गेटवर तिला काही खुणा आहेत. सर्वप्रथम ही खूण पोस्ट बॉक्सवर लाल रंगाची होती. महिलेने सांगितले की काही आठवड्यांपूर्वी तिने तिच्या लेटर बॉक्सवर हे लाल चिन्ह पाहिले होते. काही दिवसांनी तिला घराच्या गेटवर लाल रेषा दिसल्या.
महिलेने सांगितले की, तिला काळजी वाटत होती, ती घाबरलेली होती, कारण तिच्या घराचं गेट हे रात्री आपोआप उघडत होतं. महिलेने सांगितले की तिला भीती वाटते की हे चिन्ह भुताचं तर नाहीत. त्या महिलेने लोकांना विचारले की असे काही घडताना कोणी पाहिले आहे का? हे पाहून सोशल मीडिया यूजर्स तिच्या मदतीला धावून आले.
अनेकांनी तिला एकच गोष्ट सांगितली. लोकांनी सांगितले की ही खूण दरोडेखोरांनी केली आहे. हा एक प्रकारचा कोड होता जो गुन्हेगारांनी त्यांच्या साथीदारांना सूचित करण्यासाठी बनवला असावा. हे असे गुन्हेगार असतील जे लढाई करण्यासाठी इतरांचे कुत्रे चोरतात. एकाने सांगितले की, हे लोक बेकायदेशीर लढाई आयोजित करण्यासाठी कुत्रे चोरतात आणि नंतर त्यांना एकमेकांशी लढवतात. एकाने सांगितले की घराला कुलूप लावा, ती खूण पुसून टाका आणि तुमच्या पाळीव कुत्र्यांना आत ठेवा. घर लुटणारेही अशा खुणा करत असल्याचंही, असे अनेकांनी सांगितले.
[ad_2]