मुंबई ठाण्यात बुधवारीही मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोमवारपासून बरसणाऱ्या पावसानं अद्यापही मुंबईसह कोकण आणि राज्याच्या इतर भागांमध्ये उसंत घेतलेली नाही. पुढील काही दिवसांसाठी हेच चित्र पाहायला मिळेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.

बुधवारी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतरचे दोन दिवस तो यलो अलर्टमध्ये परावर्तित होईल. 

बुधवारसाठी पालघर, रायगड, पुणे, सातारा येथील घाट परिसरात तुरळक ठिकाणी रेड अॅलर्ट देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभाग व प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्यामार्फत पालघर जिल्ह्यात २० जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. 

मुंबई, ठाण्यातही सकाळच्या वेळेत मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईत मंगळवार सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ११९, तर कुलाबा येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दहिसर येथे ९३, राम मंदिर येथे ८२.५, चेंबूर येथे ७०.५, विद्याविहार येथे १०६.५, भायखळा येथे ८१, सीएसएमटी येथे १११, तर सायन येथे ९१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

आज, बुधवारसाठी मुंबईत रेड अॅलर्ट दिला आहे. ठाणे येथेही काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही राज्यांत अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पालघर, रायगड, पुणे, सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

[ad_2]

Related posts