Emerging Team Asia Cup 2023 Pakistan Given Target 206 Runs Against India Know Innings Highlights Rajvardhan Hangargekar Continues To Shine With The Ball

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

India A vs Pakistan A, Emerging Teams Asia Cup 2023 :  राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान अ संघातील फलंदाजांची दाणादाण उडाली. राजवर्धन हंगरगेकर याने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. राजवर्धन हंगरगेकर याच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान अ संघाचा डाव 205 धावांत आटोपला. भारतीय संघाला विजयासाठी 206 धावांचे आव्हान आहे. 

इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारतीय-अ संघाच्या गोलंदाजांनी पाकिस्तान अ संघाविरोधात भेदक मारा केला. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीम इंडियाच्या भेदक माऱ्यापुढे त्यांची तारंबळ उडाली. पाकिस्तान अ संघ पूर्ण 50 षटके फलंदाजीही करु शकला नाही. पाकिस्तान संघने 48 षटकात 205 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर मानव सुतार याने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. पाकिस्तानकडून कासिम अक्रम याने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली.  

श्रीलंकामध्ये सुरु असलेल्या इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहेत. या दोन्ही संघाने युएई आणि नेपाळ या संघाचा पराभव केला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांची सुरुवात खराब झाली. 9 धावसंख्येवर पाकिस्तानला दोन धक्के बसले.  सईम अयूब आणि ओमेर यूसुफ बाद झाले, या दोघांना खातेही उघडता आले नाही. त्यानंतर साहिबजादा फरहान आणि हसीबुल्लाह खान यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 48 धावसंख्येवर तिसरी विकेट पडली. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजींनी ये रे माझ्या मागल्या प्रमाणे विकेट फेकल्या. 78 धावांत पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. 

पाकिस्तानने 96 धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. अडचणीत असलेल्या पाकिस्तान संघासाठी  कासिम अक्रम आणि मुबासिर खान यांनी संयमी फलंदाजी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. मुबासिर 28 धावा काढून तंबूत परतला.  त्यानंतर कासिम याने मेहरान मुमताज याच्यासोबत 43 धावांची भागिदारी करत पाकिस्तानचा डाव 200 पार नेला.  कासिम अक्रम याने 63 चेंडूत 48 धावांची खेळी केली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 48 षटकात 205 धावांवर तंबूत परतला. भारतकडून राजवर्धन हंगरगेकर याने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या तर मानव सुतार याने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. निशांत सिंधू आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  



[ad_2]

Related posts