CM Eknath Shinde Appeal To Take Care Amid Heavy Rain In Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


CM Eknath Shinde : NDRF सह सर्व यंत्रणा सज्ज, नागरिकांना काळजी घेण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन

मुंबई: राज्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमधील शाळांना गुरूवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. राज्यातील इतर भागातील परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन निर्णय घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मंगळवारी या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

[ad_2]

Related posts