Ipl-2023-kkr-vs-lsg-match-highlights-lucknow-super-giants-won By 1 Run | IPL 2023, KKR Vs LSG Match Highlights: रिंकू पुन्हा एकटाच लढला! कोलकात्याचा एका धावेनं पराभव, लखनौचा प्लेऑफमध्ये प्रवेश

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL 2023, KKR vs LSG Match Highlights:  अटीतटीच्या लढतीत लखनौने कोलकात्याचा एका धावेने पराभव केला. लखनौने दिलेल्या 176 धावंच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने निर्धारित सात विकेटच्या मोबदल्यात 175 धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याकडून पुन्हा एकदा रिंकू सिंह याने लढा दिला. रिंकू याने अर्धशतकी खेळी करत झुंज दिली. लखनौचा स्पर्धेतील शेवट पराभवाने झाला. लखनौने अटीतटीच्या सामन्यात विजय मिळवला. या विजयासह लखनौने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. 

प्लेऑफचा तिसरा संघ मिळाला – 
आजच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव करत चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. आज दुसऱ्या सामन्यात लखनौने कोलकात्याचा पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. चेन्नई आणि लखनौ यांचे समान 17 गुण आहेत.. पण चेन्नईचा नेट रटनेर चांगला असल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर पोहचलेत. लखनौ संघ तिसऱ्या क्रमांकावर असून एलिमिनेटर सामना खेळेल.. रविवारी दोन सामने होणार आहेत…. आरसीबी आणि मुंबई यांच्यातील एक संघ प्लेऑफसाठी पात्र होईल.. मुंबई आणि हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. तर आरसीबी आणि गुजरात यांच्यात बेंगलोरमध्ये लढत होणार आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हैदराबादला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.. तर दुसरीकडे आरसीबीला गुजरातचा पराभव करावा लागेल. 

कोलकात्याचा पराभव – 
आज झालेल्या अटीतटीच्या लढतीत लखनौने कोलकात्याचा पराभव केला. लखनौ प्रथम फलंदादाजी करताना 176 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात दणक्यात जाली. जेसन रॉय आणि वेंकटेश अय्यर यांनी 61 धावांची सलामी दिली. वेंकटेश अय्यर याने 15 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. तर जेसन रॉय याने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर नीतेश राणा आणि गुरबाज यांनी विकेट फेकली. गुरबाज याने 10 तर नीतीश राणा याने आठ धावांची खेळी केली. मोक्याच्या क्षणी आंद्रे रसेल सात, शार्दुल ठाकूर तीन, सुनील नारायण एक धावांवर बाद झाले. रिंकू सिंह याने एकाकी झुंज दिली. 

रिंकू सिंह याने 33 चेंडूत 67 धावांचे योगदान दिले. रिंकूने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. अखेरपर्यंत रिंकूने सामन्यात कोलकात्याचे वर्तवस्व ठेवले. रिंकूने चार षटकार आणि सहा चौकाराच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. रिंकूला दुसऱ्या बाजूला साथ मिळाली नाही, त्याने एकाकी झुंज गिली. अखेरच्या चेंडूपर्यंत रिंकू सिंह लढला. कोलकाता संघाचा अवघ्या एका धावेने पराभव झाला. 

लखनौकडून रवि बिश्नोई आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर कृणाल पांड्या आणि कृष्णप्पा गौतम यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

[ad_2]

Related posts