Asia Cup 2023 Schedule Timetable Announced Starting Date August 30 Check Fixtures Venue

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Asia Cup 2023 Schedule : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक 2023 चे वेळापत्रक जारी केले आहे. यानुसार, भारताचे दोन्ही सामने श्रीलंकामध्ये कँडी मैदानावर होणार आहेत. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत होणार आहे तर दुसरा सामना नेपाळविरोधात 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशिया चषकाचे एकूण 13 सामने होणार आहेत. यापैकी चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. तर 9 सामने श्रीलंकामध्ये होणार आहेत. 

आशिया चषकात भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे. हा सामना श्रीलंकामधील कँडी येथील मैदानात होणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्या सामन्याने आशिया चषकाची सुरुवात होणार आहे. पहिला सामना पाकिस्तानमधील मुल्तान मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघ वगळता इतर सर्व संघ पाकिस्तानमध्ये किमान एक सामना तरी खेळणार आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे. 

















तारीख फेरी सामना ठिकाण
30 ऑगस्ट 2023 1 पाकिस्तान vs नेपाळ मुल्तान, पाकिस्तान
31 ऑगस्ट 2023 1 बांगलादेश vs श्रीलंका कँडी, श्रीलंका
2 सप्टेंबर 2023 1 पाकिस्तान vs भारत कँडी, श्रीलंका
3 सप्टेंबर 2023 1 बांगलादेश vs अफगाणिस्तान  लाहोर, पाकिस्तान
4 सप्टेंबर 2023 1 भारत vs नेपाळ  कँडी, श्रीलंका
5 सप्टेंबर 2023 1 श्रीलंका vs अफगाणिस्तान लाहोर, पाकिस्तान
6 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs B2 लाहोर, पाकिस्तान
9 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) B1 vs B2 कँडी, श्रीलंका
10 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs A2 कँडी, श्रीलंका
12 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका
14 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A1 vs B1  दांबुला, श्रीलंका
15 सप्टेंबर 2023 2 (सुपर – 4) A2 vs B2 दांबुला, श्रीलंका
17 सप्टेंबर 2023  फायनल S4 1 vs S4 2 कोलंबो, श्रीलंका

 कुठे पाहाता येणार सामने?

31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये आशिया चषक रंगणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहाता येणार आहेत. त्याशिवाय एबीपी माझ्याच्या संकेतस्थळावरही आशिया चषकासंदर्भातील अपडेट तुम्हाला पाहाता येतील. आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. हायब्रिड मॉडेलचा स्विकार केल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही? हे स्पष्ट झालेय. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. बुधवारी आशिया चषक वेळापत्रकाची घोषणा होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे. 



[ad_2]

Related posts