Rent Cab Bike To Go EV In Goa From January 2024 Goa Chief Minister Pramod Sawant Announcement

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Electric Vehicles in Goa : गोव्याला (Goa) जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे. जानेवारी 2024 पासून गोव्यामधील सर्व टूरीस्ट वाहने (Tourist Vehicle) इलेक्ट्रिक (Electric Vehicle) असणे अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे जानेवारी 2024 पासून गोव्यामधील टूरिस्ट बाईक आणि कॅब या इलेक्ट्रिक असणे बंधनकारक असेल. गोव्याचे मुख्यमंत्री (Goa Chief Minister) प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी यासंदर्भात बुधवारी घोषणा केली आहे.  

आता फक्त ईव्ही कार आणि बाईकलाच परवानगी

या नव्या सुचनेनुसार, राज्य सरकारने जानेवारी 2024 पासून सर्व नवीन पर्यटक वाहने, भाड्याने देण्यात येणाऱ्या कॅब आणि बाइक या इलेक्ट्रिक वाहने (EV) असणे अनिवार्य करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितलं की, जानेवारीपासून सर्व नवीन पर्यटन वाहने – भाड्याने कॅब आणि बाइक भाड्याने देण्यात येणारी वाहने इलेक्ट्रिक वाहने (EV) असणे अनिवार्य करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव ठेवला आहे. 

पर्यटन वाहन ईव्ही असणे बंधनकारक

पुढील वर्षी जानेवारीपासून गोव्यामध्ये भाड्याने मिळणारी सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असतील. यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटारसायकलचाही समावेश आहे. गोवा सरकारने राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी येथे भारताच्या G20 अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या चौथ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीच्या निमित्ताने NITI आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली.

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी सांगितलं की, गोवा सरकारने किनारपट्टीच्या राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2024 पासून राज्यात भाड्याने मिळणारी सर्व नवीन पर्यटक वाहने इलेक्ट्रिक असतील. यामध्ये कॅब सर्व्हिस वाहने आणि मोटार सायकलचाही समावेश आहे. इतकंच नाही तर हा नियम सरकारी ताफ्यात सामील होणाऱ्या नव्या वाहनांसाठीही लागू असेल.

टूरिस्ट बाईक आणि कॅबसाठीही नियम लागू

सावंत यांनी पुढे सांगितलं की, ‘पुढील वर्षी जानेवारीपासून सर्व नवीन पर्यटक वाहने, भाड्याने घेतलेली कॅब आणि मोटारसायकल बॅटरीवर चालणार आहेत. जानेवारी 2024 पासून सरकारने खरेदी केलेली नवीन वाहने देखील अनिवार्यपणे इलेक्ट्रिक असतील. गोव्यातील दरडोई वाहन मालकी राष्ट्रीय सरासरीच्या 4.5 पट आहे.’

 

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts