CSK vs GT Qualifier 1 Match Played In Chennai Of IPL Playoffs 2023 ; लखनौ प्ले ऑफमध्ये पोहोचली पण Qualifier 1 मधून बाहेर

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

कोलकाता : लखनौच्या संघाने विजय मिळवला आणि त्यानंतर गुणतालिकेत बदल झाल्याचे पाहायला मिळाले. हा सामना लखनौच्या संघाने जिंकला आणि ते प्ले ऑफमध्ये दाखल झाले. पण त्याला क्वालिफायर-१ सामन्यात खेळता येणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे आणि या गोष्टीचे कारणही आता समोर आले आहे.या सामन्यापूर्वी लखनौच्या संघाने १३ सामने खेळले होते. या १३ सामन्यांमध्ये लखनौच्या संघाने सात विजय मिळवले होते, तर चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे या सामन्यात लखनौच्या संघाला एक गुण मिळाला होता. त्यामुळे या सामन्यापूर्वी लखनौच्या खात्यामध्ये १५ गुण होते. या १५ गुणांसह ते तिसऱ्या स्थानावर होते. हा सामना जर लखनौने ९५ पेक्षा जास्त धावांनी जिंकला असता तर त्यांना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचता आले असते. पण ही गोष्ट काही लखनौला जमली नाही आणि त्यामुळे गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स यांच्यात क्वालिफायर-१ हा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले. हा सामना चेन्नईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे आता धोनीचा संघ पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानात खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लखनौच्या संघाने हा सामना जिंकला आणि त्यामुळे आता त्यांचे १७ गुण झाले आहेत. या १७ गुणांसह लखनौच्या संघाने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. पण त्याला क्वालिफायर-१ सामन्यात पोहोचता आले नाही.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस


लखनौच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळत होते. पण जेव्हा लखनौचा कर्णधार लोकेश राहुल दुखापतीमुळे आयपीएलच्या बाहेर गेला तेव्हा काही सामंने लखनौने गमावले होते. पण त्यानंतर मात्र कृणाल पंड्याच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ गेल्या काही सामन्यांत चांगली कामगिरी करत होता. पण केकेआरच्या सामन्यात मात्र त्यांच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले. कारण निकोलस पुरनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पण लखनौच्या गोलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली. त्यामुळे या सामन्यावर लखनौच्या संघाला काही काळ आपला अंकुश ठेवता आला होता.

[ad_2]

Related posts