[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ISRO Tested Gaganyaan SMPS : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारत आता नव्या गगनयान अंतराळ मोहीमेसाठी (ISRO Gaganyaan Mission) सज्ज झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोनं (ISRO) मानवी अंतराळ मोहीमेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. इस्त्रोकडून गगनयानच्या इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. इस्रोने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. गगनयान हे भारतीय अंतराळ संस्थेची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. इस्रोने ISRO ने गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीम (Service Module Propulsion System) म्हणजेच SMPS ची यशस्वी चाचणी केली आहे.
गगनयानच्या इंजिनची चाचणी यशस्वी
इस्रोने गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीम (Service Module Propulsion System) ची चाचणी यशस्वी केली आहे. गगनयानचे सर्व्हिस मॉड्युल एक नियंत्रित द्वि-प्रोपेलेंट आधारित प्रणाली आहे. जी ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा पूर्ण करते. यामध्ये ऑर्बिट इंजेक्शन, परिक्रमा, ऑन-ऑर्बिट कंट्रोल, डी-बूस्ट मॅन्युव्हरिंग आणि चढाईच्या टप्प्यात मदत करते.
ISRO successfully tested the Gaganyaan Service Module Propulsion System (SMPS) – which caters to the requirements of the Orbital Module – at IPRC, Mahendragiri.
The hot test was conducted in SMPS’s final configuration. https://t.co/yO0O1I77p2 pic.twitter.com/0Wn4KzGfTU
— ISRO (@isro) July 20, 2023
इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम
इस्रोने 2023 मध्ये गगनयान मोहीम हाती घेतली आहे. यावर्षाच्या शेवटी गगनयानचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. गगनयान ही भारताची पहिली मानव मोहीम अंतराळात असेल. यामध्ये तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यात येईल. 2023 मध्ये गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी तीन चाचणी मोहिमा केल्या जातील. या तीन चाचणी मोहिमा मानवरहित असतील. या चाचणी मोहिमांसाठी रोबोट अंतराळात पाठवला जाईल. यासाठी एक ह्युमनॉइज रोबोट पाठवला जाईल. इस्रोने ‘व्योमित्र’ नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो चाचणीसाठी अवकाशात पाठवला जाईल. हा ‘हाफ-ह्युमनॉइड’ रोबोट अवकाशातून इस्रोला अहवाल पाठवेल.
सर्व्हिस मॉड्यूल सिस्टीम (SMPS) चं काम काय?
सर्व्हिस मॉड्यूलमध्ये सिस्टीम हे अंतराळयानाच्या इंजिनप्रमाणे काम करतं. हे मुख्य प्रोपल्शन इंजिन असते. याचा वापर अंतराळयानाला चंद्राभोवती कक्षेत ठेवण्यासाठी आणि चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने पाठवण्यासाठी केला जातो. चंद्रावर आणि तेथून दोन्ही प्रवासात अंतराळयानाचा मार्ग दुरुस्त करण्यासाठी देखील या इंजिनचा वापर केला जातो.
इस्रोची गगनयान मोहीम कशी असेल?
भारत आपल्या पहिल्या अंतराळ मोहिमेत अंतराळवीरही पाठवणार आहे, 3 दिवस अंतराळात पाठवले जाईल. जे सुमारे 400 किमी उंचीवर कक्षेत राहील. यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या चाचण्यांचेही नियोजन करण्यात आलं आहे. ज्यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, टेस्ट व्हेईकल मिशन्स, पॅड अॅबॉर्ट टेस्ट, मानवरहित उड्डाण या चाचण्या करण्यात येतील. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारत गगनयानातून मानवाला अंतराळात पाठवणार आहे.
[ad_2]