( प्रगत भारत । pragatbharat.com)
Khappar Yog : वैदिक पंचांगानुसार, अधिकार मास 18 जुलैपासून सुरू झालाय. हा अधिक मास 16 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या काळात लक्ष्मी नारायण आणि बुधादित्य राज योग देखील तयार होणार आहे. मात्र असं असताना एक अशुभ योग देखील यामध्ये आहे. खप्पर योग असं या योगाचं नाव असून शुक्र आणि शनीच्या वक्रीमुळे हा योग तयार होत आहे.
दरम्यान या योगाचे परिणाम काही राशींवर होणार आहेत. यामध्ये पुढील 30 दिवस काही राशींच्या व्यक्तींना सावध रहावं लागणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होणार आहेत.
कर्क रास ( Cancer Zodiac )
खप्पर योग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना पैशाच्या बाबतीत समस्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे करियरशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकता. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्ज घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. कुटुंबातील सदस्यांशी वाद वाढू शकतात. जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा लोकांशी वाद होऊ शकतो.
कन्या रास ( Kanya Zodiac )
खप्पर योग तुमच्यासाठी हानिकारक ठरण्याची शक्यता आहे. या काळात जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च होऊ झाल्याने बजेट बिघडू शकतं. तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादाला सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबातील काही व्यक्ती आजारी पडू शकतात. जुनी दुखणी पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता आहे.
मीन रास ( Meen Zodiac )
मीन राशीच्या लोकांसाठी ख्पपर योग हानीकारक ठरण्याची शक्यता आहे. कोणतंही नवीन कार्य सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो पुढे ढकलावा. कोर्टाशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर त्यामध्ये यश मिळणार नाही. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. गाडी चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )