18 Year Old Pakistani Cricketer Ayesha Naseem Announced Retirement For Islam ; वयाच्या १८ वर्षीच सोडलं क्रिकेट, नेमकं कारण ठरलं तरी काय, ऐकाल तर तुम्हालाही बसेल धक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : वयाच्या १८ वर्षी लोकांची करीअर सुरु पण होत नाहीत. पण वयाच्या १८ व्या वर्षी एका गुणवान युवा क्रिकेट खेळाडूने चक्क निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूने असा निर्णय नेमका का घेतला, याचे कारण आता समोर आले आहे. पण हे निवृत्तीचे कारण मात्र चाहत्यांना धक्का देणारे आहे.

क्रिकेट विश्वात लांब लांब षटकार मारण्यासाठी ती प्रसिद्ध होती. त्यामुळे तिचे भविष्य उज्वल आहे, असे म्हटले जात होते. काही दिवसांमध्येच एका मोठ्या स्पर्धेत तिला खेळण्याची संधी होती. पण त्यापूर्वीच तिने निवृत्ती घेतली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. ही गोष्ट आहे ती पाकिस्तानची महिला धडाकेबाज क्रिकेट खेळाडू आयेशा नसीमची. आयेशा ही क्रिकेट विश्वात लांब लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होती. २०२३ साली झालेल्या महिला टी-२० विश्वचषकातील दोन सर्वात लांब षटकार आयेशाने मारले होते. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने ८१ मीटर लांब षटकार ठोकला. या स्पर्धेतील हा सर्वात लांब षटकारही होता. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने ७९ मीटर लांब षटकार मारला होता. आयेशा नसीमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आयशा फक्त १८ वर्षांची आहे. इस्लामनुसार जीवन जगण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. गुरुवारी तिने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. आयशाने २०२० मध्ये पाकिस्तानसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तिने पीसीबीला सांगितले की, ‘मी क्रिकेट सोडत आहे आणि माझे जीवन इस्लामनुसार जगायचे आहे.’

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

आयेशा नसीमने पाकिस्तानसाठी ४ वनडे आणि ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने ३० सामन्यांच्या T20 कारकिर्दीत १२८ च्या स्ट्राइक रेटने ३६९ धावा केल्या आहेत. वनडेमध्ये तिच्या फक्त ३३ धावा आहेत. तिने तिच्या T20 कारकिर्दीत १८ षटकारही मारले आहेत. पाकिस्तान महिला संघासाठी टी-२- इतिहासात आयशापेक्षा फक्त निदा दारने जास्त म्हणजेच २७ षटकार जास्त मारले आहेत. मात्र निदाने १३० सामने खेळले आहेत.

[ad_2]

Related posts