Lsg Vs Kkr Ipl 2023 Latest Points Table Here Know In Details RCB MI CSK 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IPL Playoffs Race : आयपीएल 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स हा प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ टॉप-4 मध्ये पोहोचणारे संघ ठरले आहेत. आता लखनौ सुपर जायंट्स 17 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. यामुळे आता प्लेऑफसाठीचे तीन संघ निश्चित झाले असून एक जागा शिल्लक आहे. 

तीन संघ प्लेऑफमध्ये दाखल

प्लेऑफमध्ये शेवटच्या चौथ्या जागेसाठी मुंबई, बंगळुरु आणि राजस्थान संघाला संधी आहे. आयपीएल गुणतालिकेत सध्या गुजरात संघ 18 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर चेन्नई 17 गुणांसह दुसऱ्या आणि लखनौ 17 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हे तिन्ही संघ प्लेऑफमध्ये दाखल झाले आहेत. 

प्लेऑफमधील शेवटच्या जागेसाठी तीन संघात चढाओढ

याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 13 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्स 14 सामन्यांत 14 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे, मात्र या संघाचा प्लेऑफमधील प्रवेश मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यांच्या निकालांवर अवलंबून असेल. मुंबई आणि आरसीबीचा आजच्या सामन्यात पराभव झाल्यास राजस्थान प्लेऑफमध्ये धडक मारेल.

राजस्थान संघालाही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी

राजस्थान संघ सध्या 14 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यांच्या निकालावर तीन संघांचं भविष्य अवलंबून आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघ सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहोचेल. मुंबई इंडियन्सकडे सध्या 13 सामन्यांनंतर 14 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. रविवारी वानखेडे स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादसमोर मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे.

चार संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे 13 सामन्यांत 12 गुण असून संघ सातव्या क्रमांकावर आहे. तर पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर आहे. याशिवाय शेवटच्या दोन स्थानांवर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज संघाकडे प्रत्येकी 12-12 गुण आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सचे 10 गुण आणि सनरायझर्स हैदराबादचे 8 गुण आहेत.

[ad_2]

Related posts