[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Shubman Gill Stats: वेस्ट इंडिजविरोधात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिल याला दोन्ही कसोटीमध्ये अपयश आलेय. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीमध्ये गिल याने निराश केलेय. अंडर-19 वर्ल्ड कप, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्य दमदार कामगिरी केल्यानंतर शुभमन गिल याला भारतीय संघात स्थान मिळाले. शुभमन गिल याला आशिया खंडाबाहेर धावा जमवण्यात अपयश आलेय.
आयपीएलमध्ये शुभमन गिल याने खोऱ्याने धावा काढल्या. गिलच्या दमदार फलंदाजीच्या बळावर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली. ऑस्ट्रेलियाविरोधात वनडेमध्ये द्विशतक झळकावले. टी२० मध्ये शतकही झळकावले. पण आशियाबाहेर गिलची बॅट शांतच असल्याचे दिसतेय.
चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थित गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला होता. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. गिल अपयशी ठरण्याची ही पहिली वेळ नाही. मागील आठ डावात गिल याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. अहमदाबाद कसोटी सामना वगळला तर सात डावात त्याला फक्त 90 धावांची खेळी करता आली आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 21 इतकी राहिली आहे. अहमदाबाद कसोटीमध्ये गिल याने 128 धावांची खेळी केली होती. पण हा अपवाद वगळता मागील आठ डावात तो अपयशी ठरलाय. वेस्ट इंडिजविरोधात गिल याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पहिल्या कसोटीत सहा तर दुसऱ्या कसोटीत फक्त दहा धावांची खेळी करता आली.
आशियाबाहेर फ्लॉप –
2023 मध्ये शुभमन गिल याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय. पण आशियाबाहेर कसोटीमध्ये गिल याची बॅट शांतच असल्याचे दिसतेय. आशियाबाहेर झालेल्या कसोटीमध्ये सहा डावात खराब रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. सात कसोटी सामन्यात त्याला फक्त दोन अर्धशतक झळकावली आहेत. आशिया खंडाबाहेर मागील सहा डावात शुभमन गिल याला 30 धावसंख्याही ओलांडता आली नाही. 6, 18, 13, 4 17, 8 आणि 28 धावांची खेळी केली. त्यामुळे गिलसाठी वेस्ट इंडिजविरोधात होणारा दुसरा कसोटी सामना महत्वाचा आहे.
कसोटी आणि टी 20 मध्ये धावांचा पाऊस पाडणारा शुभमन गिल कसोटीत फ्लॉप जात असल्याचे समोर आलेय. शुभमन गिल याने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून आतापर्यंत 17 कसोटी सामन्यात 31.96 च्या सरासरीने त्याने 927 धावा केल्या आहेत. 2 शतक आणि चार अर्धशतकाचा समावेश आहे. पहिले शतक बांगलादेशविरोधात तर दुसरे शतक ऑस्ट्रेलियाविरोधात झळकावली आहेत.
वनडेमध्ये द्विशतक –
एकदिवसीय क्रिकेटमध्ये शुभमन गिल याने द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. 2023 मध्ये न्यूझीलंडविरोधात गिल याने 208 धावांची खेळी केली होती. गिल याने भारतासाठी आतापर्यंत 24 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये 66 च्या सरासरीने 1311 धावा केल्या आहेत. पाच अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. शुभमन गिल याने सहा टी 20 मध्ये 202 धावा केल्या आहेत.
[ad_2]