Tata Steel Made Crane Used In Chandrayaan 3 Rocket Launch; Chandrayaan-3: चांद्रयान-३ मोहिमेत TATAचे महत्त्वाचे योगदान; उड्डाणासाठी इस्रोला अशी मदत केली

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेतील चौथा टप्पा यशस्वी झाला आहे. इस्रोने गुरुवारी चांद्रयान-३ चे चौथे ऑर्बिट-रेजिंग मॅनूवर यशस्वीपणे पार पडल्याची अपडेट दिली. या पुढील ऑर्बिट-रेजिंग मॅनूवर २५ जुलै रोजी दुपारी २ ते ३च्या दरम्यान केले जाणार आहे.

चांद्रयान-३च्या यशस्वी उड्डाणानंतर सर्वजण इस्रोचे कौतुक करत आहेत. या मोहिमेत इस्रोसोबत देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता. यात देशाच्या उद्योग विश्वात नेहमीच आदराने घेतले जाणाऱ्या टाटा ग्रुपमधील एका कंपनीचा महत्त्वाचा वाटा आहे. चांद्रयान-३ ला अवकाशात पोहोचवणाऱ्या रॉकेट लॉन्चसाठी ज्या क्रेनचा वापर करण्यात आला होता ती क्रेन टाटा स्टीलच्या फॅक्ट्रीत बनवण्यात आली होती.
टाटा स्टीलने चांद्रयान-३च्या यशस्वी उड्डाणानंतर इस्रोचे अभिनंदन केले. त्याच बरोबर हे देखील सांगितले की, आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, टाटा स्टीलने तयार केलेल्या क्रेनने आंध्र प्रदेश येथील सतीश धवन केंद्रावर उड्डाणात महत्त्वाची भूमिका पार पाडली. बुधवारी कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलाय. टाटा स्टीलने ज्या क्रेनचा उल्लेख केला त्याची निर्मिती जमशेदपूर येथील टाटा ग्रोथ शॉपमध्ये झाली होती.

टाटा स्टीलची सुरुवात भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी झाली होती. टाटा स्टीलला आधी टिस्को या नावाने देखील ओळखले जात होते. याची स्थापना १९०७ साली झाली होती. तेव्हा जमशेदपूरला लोक टाटा नगर देखील म्हणायचे. या कारखान्यात १९१२पासून उत्पादनाला सुरुवात झाली होती.

इस्रोच्या चांद्रयान-३ मोहिमेत टाटा सोबत आणखी एका दिग्गज कंपनीचा महत्त्वाचा रोल राहिला आहे. मुंबईतील खासगी कंपनी असलेल्या एरोस्पेस कंपनी Godrej Aerospaceने या मोहिमेसाठी महत्त्वाची उपकरणे पुरवली आहेत. ज्यात रॉकेट इंजिन आणि थ्रस्टरचा पुरवथा गोदरेज एरोस्पेसकडून तयार करण्यात आलाय. कंपनीचे बिझनेस हेड मानेक बेहरामकानदीन यांनी चांद्रयान-३च्या उड्डाणा दिवशी या गोष्टीचा आम्हाला खुप अभिमान आहे की आम्ही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भविष्यात देखील इस्रोच्या मोहिमेत आम्ही योगदान देऊ.

चांद्रयान – ३ ची अवकाशात ऐतिहासिक झेप

[ad_2]

Related posts