Sachin Tendulkar Instagram Post for Virat Kohli Century in WI vs IND 2nd Test; सचिन तेंडुलकरने थोपटली विराट कोहलीची पाठ; ‘रेकॉर्डब्रेक’ शतकासाठी केली खास पोस्ट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा धाकड फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकावले. विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीतील हे २९ वे शतक आहे. याचसोबत विराटने त्याच्या ५०० व्या इंटरनॅशनल सामन्यात शतक झळकावत एक वेगळाच इतिहास रचला. विराट कोहलीने २०६ चेंडूत १२१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार मारले. या शतकासह भारताच्या माजी कर्णधाराने परदेशी भूमीवर कसोटी सामन्यातील शतकाचा दुष्काळ संपवला. आता यावर स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक पोस्ट केली आहे.

विराटच्या बॅटमधून शतकाची प्रतीक्षा अगदी सर्वांनाच होती. बराच काळ विराट कोहलीला परदेशी भूमीवर कसोटी सामन्यांमध्ये शतकाचा टप्पा ओलांडता आला नाही, पण या सामन्यात चाहत्यांची प्रतीक्षा संपली. यानंतर चाहत्यांपासून दिग्गज क्रिकेटपटूंपर्यत सर्वांनीच विराटची वाहवा केली. यामध्ये सचिन तेंडुलकरने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले. क्रिकेटच्या देवाने इंस्टाग्राम कोहलीचा फोटो शेअर करत त्याला एक चॅन कॅप्शन दिले आहे.

विराटसाठी सचिनची पोस्ट

त्याचबरोबर विराट कोहली शतकानंतर सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटरचे सतत कौतुक करत असतात. मात्र, आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने विराट कोहलीच्या शतकाचे कौतुक केले आहे. सचिन तेंडुलकरने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये विराट कोहली दिसत आहे. याशिवाय सचिन तेंडुलकरने ‘अजून एक दिवस आणि विराट कोहलीचे अजून एक शतक. उत्कृष्ट खेळलास.’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. सचिन तेंडुलकरची इन्स्टाग्राम स्टोरी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

Sachin Tendulkar Instagram Story for Virat Kohli Century

सचिनचा विक्रम मोडला

सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, राहुल द्रविडनंतर विराट कोहली भारताकडून ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा चौथा फलंदाज ठरला आहे. विराटने ५०० सामने खेळेपर्यंत ७६ शतके झळकावली तर सचिनने ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळेपर्यंत ७५ शतके झळकावली होती. याबाबतीत विराटने शाहीनचा हा विक्रम मोडीत काढला आहे. याचसोबत कोहलीने आतापर्यंत कसोटीत एकूण २९ शतके झळकावली आहेत. या कामगिरीसह कोहलीने आपल्या कारकिर्दीत २९ शतके झळकावणाऱ्या डॉन ब्रॅडमनचीही बरोबरी केली आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

[ad_2]

Related posts