Mukesh Kumar’s Maiden Test Wicket Video Became Viral In IND vs WI ; रोहित शर्माने दिली संधी आणि मुकेश कुमारने पहिल्याच –सामन्यात केला पराक्रम, पाहा भन्नाट Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन : रोहित शर्मा हा एक चांगला कर्णधार आहे आणि नवीन खेळाडूंना तो व्यासपीठ उपलब्ध करून देत असतो, हे आतापर्यंत पाहायला मिळाले होते. पण या गोष्टीचा प्रत्यय हा आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातही आला. कारण रोहितने यावेळी दुसऱ्या कसोटी सामन्यात गरीब घरातून आलेल्या मुकेश कुमारला संधी दिली. मुकेशनेही आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. कारण आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने एक दमदार विक्रम रचला आहे.मुकेश कुमार हा बिहारमधील एका लहान खेडेगावातून उदयाला आला. रणजी स्पर्धा आणि त्यानंतर आयपीएल त्याने गाजवली. त्यामुळेच त्याला भारतीय संघात स्थान मिळाले. त्यानंतर रोहितने आता या दुसऱ्या सामन्यात त्याला संधी दिली आणि त्याने या संधीचे सोने केले. जेव्हा भारताला विकेटची नितांत गरज होती तेव्हा रोहितने चेंडू मुकेशच्या हातात दिला. मुकेशने यावेळी रोहितचा विश्वास सार्थ ठरवला.

वेस्ट इंडिजचे क्रेग ब्रथेवेट आणि क्रिक मॅकेन्झी ही जोडी चांगलीच जमली होती. रोहितने सर्वांना गोलंदाजी देऊन पाहिली, पण त्याला काही यश मिळत नव्हते. अखेर रोहितने मुकेशच्या हाती चेंडू सुपूर्द केला आणि त्याने रोहितला निराश केले नाही. मुकेशने मॅकेन्झीला यष्टीरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले आणि भारताला मोलाची विकेट मिळवून दिली. आपल्या पहिल्यात सामन्यात पहिली विकेट मिळवण्यात मुकेश यशस्वी ठरला. मुकेशने यावेळी पहिल्या विकेटचे जोरदार सेलिब्रेशन केले. भारतीय खेळाडूंनीही यावेळी जोरदार सेलिब्रेशन केले. मुकेशने विकेट मिळवल्यावर विराट कोहलीने त्याला पहिली मिठी मारली. त्यानंतर भारताच्या अन्य खेळाडूंनीही त्याचे अभिनंदन केले. मुकेशच्या या पहिल्या विकेटचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

पहिला सामना हा सर्वांसाठी महत्वाचा असतो आणि या पहिल्या सामन्यात पहिली विकेट मिळवण्याच पराक्रम मुकेशने केला आहे. त्यामुळे आता मुकेश यापुढे कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts