Ajinkya Rahane Outstanding Diving Slip Catch in WI vs IND 2nd Test Mumbai Indians Tweet Goes Viral Watch Video; रहाणे भाऊ काय कॅच पकडली राव! अजिंक्य रहाणेच्या मैदानावरील लव्हस्टोरीवर मुंबई इंडियन्सही फिदा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पोर्ट ऑफ स्पेन: भारत वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या कसोटीत विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगलंच तंगवलं. भारताच्या गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी बरेच शर्थीचे प्रयत्न करावे लागले. खेळपट्टी आणि परिस्थितीमुळे सामन्याच्या तीनही दिवस गोलंदाजांना फारशी मदत मिळाली नाही, ज्यामुळे फलंदाजांना बाद करण्यासाठी काही करिष्माई चेंडू किंवा शानदार क्षेत्ररक्षण आवश्यक होते. हे भारतीय डावात विराट कोहलीच्या धावबादच्या रूपात पाहायला मिळाले, तर विंडीजच्या फलंदाजीत अजिंक्य रहाणेने घेतलेला कमाल झेल फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये परतवण्यात महत्त्वाचा ठरला.

कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी वेस्ट इंडिजने आपला डाव पुढे सरकवायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा विंडीजच्या फलंदाजांनी जास्तीत जास्त धावा करण्याऐवजी विकेट वाचवण्यावर भर दिला. याचा परिणाम असा झाला की खेळपट्टीकडूनही मदत न मिळाल्याने भारतीय गोलंदाजांना सहज विकेट्स मिळाल्या नाहीत. सामन्याच्या तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकात रवींद्र जडेजाला यश मिळाले पण या यशाचा आणि विकेटचा खरा मानकरी होता तो म्हणजे अजिंक्य रहाणे.

रहाणेचा शानदार झेल

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दौऱ्यावर फलंदाजीत दोन्ही डावात अपयशी ठरला पण दुसऱ्या कसोटीत त्याने निश्चितपणे आपल्या क्षेत्ररक्षणाने प्रभाव पाडला. तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात जर्मेन ब्लॅकवूडच्या उत्कृष्ट चौकाराने झाली, मात्र तिसऱ्या चेंडूवरच त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. ब्लॅकवुडने रवींद्र जडेजाच्या या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण चेंडूने बॅटची कड घेतली आणि स्लिपमधून चेंडू जाणार इतक्यातच अजिंक्यने डाईव्ह मारली आणि अनपेक्षित झेल टिपला.

टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट स्लिप क्षेत्ररक्षक असलेला रहाणे हा अशा प्रसंगासाठी उभा होता आणि चेंडू येताच त्याने डाव्या बाजूला एक लांब डाईव्ह घेतला आणि केवळ एका हाताने हा झेल घेऊन खळबळ उडवून दिली. ब्लॅकवुडला तर विश्वासच बसत नव्हता. पण त्याला पॅव्हेलियनमध्ये परतण्यावाचून पर्याय नव्हता कारण स्लिपमध्ये रहाणेकडून क्वचितच चूक होऊ शकते.
मुंबई इंडियन्स ट्विट

अजिंक्य रहाणेच्या स्लिपमधील या कमाल झेलची खूपच प्रशंसा होत आहे. ट्विटरवर त्याचे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. यावर आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनेही एक खास ट्विट केले आहे, या ट्विटमध्ये त्यांनी अजिंक्यचा फोटो पोस्ट करत अज्जू आणि स्लिप कॅचिंग – या लव्हस्टोरी असं कॅप्शन दिले आहे.

[ad_2]

Related posts