समृद्धी महामार्गावरील टोलनाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील टोल नाका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फोडला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर थांबवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत मनसैनिकांनी हा टोलनाका फोडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर येथून सिन्नर कडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना अर्धा तास थांबवून ओळख देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला.

टोलनाका कर्मचाऱ्यांनी अरेरावी आणि गैरवर्तन केल्याचा दावा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकाराचा निषेध म्हणून हा टोलनाका फोडल्यात आला. 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन टोल नाक्यावरील केबिनची तोडफोड (Vandalized) केली. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

या प्रकारामुळे टोल नाक्यावर बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर वावी पोलिसांना (Vavi Police) याबाबत माहिती कळल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत.

महासंपर्क अभियानासाठी अमित ठाकरे दोन दिवस शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत.  कार्यकर्त्यांनी तब्बल चार तास अमित ठाकरे यांची वाट पाहिली. मात्र ते फक्त काही मिनिटं थांबले असा आरोप करण्यात येत आहे. अमित ठाकरे यांच्या कृतीमुळे मनसे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज कार्यकर्ते राजीनामा देणार असल्याचे समजते. 


हेही वाचा

‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ एकनाथ शिंदेंच्या बंगल्याजवळ अजित पवारांचे बॅनर

[ad_2]

Related posts