Raj Garje Suicide Case Congress Mla Atul Londhe Demand Action On Suspect In Suicide Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Suicide News :  पुण्यातील राज गर्जे आत्महत्या प्रकरणात आता काँग्रेसनं उडी घेतली आहे.  काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर ॉआता अतुल लोंढे यांनी याप्रकरणी पोलीस निरीक्षक यांचे निलंबन करावे, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा दिला इशारा दिला आहे. 

पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आत्महत्या केली होती. राज रावसाहेब गर्जे असं या 22 वर्षीय तरुणाचं नाव होतं. राज याने मध्यस्थीने जोशी याला काही पैसे उसने घेऊन दिले होते. परंतु, ते पैसे जोशी परत देत नव्हता. त्यामुळे राज मानसिक तणावात आला होता. या तणावातून राजने 10 मे रोजी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. निरूपम जयवंत जोशी याच्याविरूध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजचे वडिल रावसाहेब प्रल्हाद गर्जे  यांनी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. 

लोंढे यांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?

लोंढे यांनी ट्वीट करत चौकशी कऱण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय़ की, पुण्यातील राज गर्जे याच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख असून देखील अद्याप याप्रकरणी जोशी नामक व्यक्तीला 12 दिवसानंतरही अटक का नाही? देवेंद्र फडणवीस आपण याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. मृत्यनंतर तरी त्याला न्याय मिळावा. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ निलंबन करावे अन्यथा या विरुद्ध काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे. यांच्यावर पोलीस कुठली कलमं लावतात हे बघूया कारण राजकीय दबाव पोलिसांनवर टाकण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

गरिबाला न्याय द्या; जितेंद्र आव्हाड

याच प्रकरणात यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील उडी घेतली होती. त्यांनी या गरिबाला न्याय द्या, अशी मागणी त्यांनी केली होती.  मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील सगळे फरार आहेत. 

 



[ad_2]

Related posts