RCBs Equation Based On MI Vs SRH IPL 2023 Marathi News Update

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

RCB’s Equation based on MI Vs SRH : करो या मरोच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली आहे. वानखेडे मैदानावर मुंबईने हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. आरसीबी, मुंबई आणि राजस्थान या संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. राजस्थानच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्याचे चान्स कमी आहेत. पण मुंबई आणि आरसीबी यांचे प्लेऑफचे आव्हान एकमेंकाच्या सामन्यावर अवलंबून आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी केल्यास रनरेटसाठी त्यांना 80 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवावा लागत होता. पण आता मुंबईने प्रथम गोलंदाजी घेत धावांचा पाठलाग करण्याचे ठरवलेय. त्यामुळे आरसीबीसाठी प्लेऑफचे समीकरणही बदललेय. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीचे काय समीकरण आहे.. ते पाहूयात… 

RCB’s Equation based on MI Vs SRH:

मुंबई आणि हैदराबाद या सामन्यानंतर बेंगलोरमध्ये आरसीबी आणि गुजरात यांच्यात लढत होणार आहे. या दोन लढतीनंतर प्लेऑफचा चौथा संघ कोण हे निश्चित होईल. आरसीबी आणि मुंबईसाठीची समीकरणे समोर आली आहेत. हैदराबादविरोधात मुंबईच्या कामगिरीवर आरसीबीचे प्लेऑफचे तिकिट ठरणार आहे. आरसीबीचे प्लेऑफचे समीकरण कसेय ते पाहूयात… 

हैदराबादने दिलेल्या आव्हानाच पाठलाग मुंबईने आठ षटकात केला. तर आरसीबीला गुजरातचा 40 धावांनी पराभव करावा लागेल. 

मुंबईने हैदराबादने दिलेले आव्हान 10 षटकात पार केल्यास…. आरसीबीला 20 धावांनी विजय मिळवावा लागेल. 

जर मुंबईने 12 षटकात हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग केल्यास आरसीबीला फक्त विजय मिळवावा लागेल. 

राजस्थानलाही संधी – 

आरसीबी आणि मुंबईचा पराभव झाल्यास राजस्थानचा संघालाही प्लेऑफमध्ये प्रवेश मिळू शकतो. आरसीबीचा मोठ्या फरकाने पराभव व्हायला लागेल. आरसीबीचा रनरेट चांगलाय. प्लेऑफचा तिसरा संघ कोणता? याकडे लक्ष लागलेय. 

लखनौ तिसऱ्या क्रमांकावर – 

आजच्या पहिल्या सामन्यात दिल्लीचा पराभव करत चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. आज दुसऱ्या सामन्यात लखनौने कोलकात्याचा पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. चेन्नई आणि लखनौ यांचे समान 17 गुण आहेत.. पण चेन्नईचा नेट रटनेर चांगला असल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर पोहचलेत. लखनौ संघ तिसऱ्या क्रमांकावर असून एलिमिनेटर सामना खेळेल.. रविवारी दोन सामने होणार आहेत…. आरसीबी आणि मुंबई यांच्यातील एक संघ प्लेऑफसाठी पात्र होईल.. मुंबई आणि हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर सामना होणार आहे. तर आरसीबी आणि गुजरात यांच्यात बेंगलोरमध्ये लढत होणार आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हैदराबादला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल.. तर दुसरीकडे आरसीबीला गुजरातचा पराभव करावा लागेल. 

आणखी वाचा :

RCB vs GT : आरसीबीची चिंता वाढली! बंगळुरुमध्ये पावसाची हजेरी; आजच्या सामन्यावर पावसाचं सावट

[ad_2]

Related posts